मुंबई : कॉमेडियन कपिल शर्मा प्रेक्षकांना खळखळून हसवतो. पण अनेकदा त्याचं नाव अनेक वादांमध्येही येतं. आता पुन्हा एकदा कपिल शर्मा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. खरंतर कपिल शर्मावर परदेशात गुन्हा दाखल झाला आहे. कपिल शर्मा सध्या त्याच्या कॉमेडी टूरचा आनंद घेत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जिथे त्याची टीमही त्याच्यासोबत आहे. कॅनडा दौऱ्यादरम्यान कपिल शर्मावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिनेत्यावर गंभीर आरोपही करण्यात आले आहेत. ज्यामुळे त्याच्या अडचणी वाढू शकतात. त्याच्या कॉमिक टायमिंगचं सर्वांनाच वेड आहे. त्याचबरोबर कपिलचंही वादाशी जुनं नातं आहे. जे आता पुन्हा एकदा जोडताना दिसत आहे.


कॉन्ट्रॅक्टचं उल्लंघन केल्याचा आरोप
कपिल त्याच्या सहकाऱ्यांसोबत कॅनडामध्ये परफॉर्म करण्यासाठी गेला होता. दरम्यान, त्याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. उत्तर अमेरिकेतील कराराच्या उल्लंघनाबाबत ही तक्रार करण्यात आली आहे. ही घटना सध्याच्या दौऱ्याची नसून 7 वर्षांपूर्वी 2015 मधील आहे.


अमेरिका दौरा प्रकरण
मीडिया रिपोर्ट्सनुसार, SAI USA INC ने कपिल शर्माच्या 2015 च्या उत्तर अमेरिका दौऱ्यात कराराचा भंग केल्याबद्दल खटला दाखल केला आहे. अमित जेटली, अमेरिकेतील शोचे सुप्रसिद्ध प्रवर्तक यांच्या म्हणण्यानुसार, हे प्रकरण सहा शोशी संबंधित आहे. ज्यासाठी कपिल शर्माला 2015 मध्ये उत्तर अमेरिकेत साईन केलं गेलं आणि पैसे दिले गेले. त्या सहा शहरांपैकी एकाही शहरात अभिनेत्याने परफॉर्म केलं नसल्याचा आरोप जेटली यांनी केला आहे.


आश्वासन देऊनही पैसे परत आले नाहीत
एवढंच नाही तर कॉमेडियनने त्यासाठी दिलेले पैसे परत करीन असं आश्वासन दिलं होतं. मात्र कपिलने ते पैसे आजपर्यंत परत केलेले नाहीत. त्याने काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. न्यायालयात जाण्यापूर्वी आम्ही त्यांच्याशी अनेकदा बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याकडून आम्हाला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. हे प्रकरण अद्याप न्यूयॉर्क कोर्टात असून आता कपिलवर कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती जेटली यांनी दिली.