Case Filed Against Rana Duggubati And Father Suresh Babu : 'बाहुबली' (Bahubali) चित्रपटातील अभिनेता राणा दग्गुबती (Rana Duggubati) हा लोकप्रिय दाक्षिणात्य कलाकारांपैकी एक आहे. 'राणा दग्गुबती' हा सोशल मीडियावर सक्रिय नसला तरी चर्चेत असतो. दरम्यान, यावेळी राणा एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. राणा दग्गुबती आणि त्याचे वडील सुरेश बाबू यांच्यावर जमीन बळकावण्याचा आरोप लावण्यात आला आहे. हैद्राबादमधील उद्योगपती प्रमोद कुमार यांनी या दोघांविरोधात तक्रार दाखल केली आहे. मीडिया रीपोर्टनुसार या दोघांच्या विरोधात केसही दाखल करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उद्योगपती प्रमोद कुमार म्हणाले की राणा आणि त्याच्या वडिलांनी त्याला गुंडांच्या मदतीनं जमीन खाली केली आणि दोघांनाही त्याला धमकावले. त्याशिवाय या दोघांनी धमकीदेखील दिली. 2014 मध्ये राणा आणि त्याच्या वडिलांनी हैद्राबादच्या फिल्म सिटी परिसरातील त्यांची एक जमीन प्रमोद कुमार यांना हॉटेलसाठी भाड्यावर दिली होती. आता राणा आणि त्याचे वडील सुरेश बाबू हे ती जमीन विकणार आहेत. त्यासाठी त्यांनी भरपाई म्हणून प्रमोद कुमार यांना 5 कोटी दिले. यानंतर प्रमोद कुमार यांनी जमीन सोडण्यास नकार दिला होता. याशिवाय हा सगळा प्रकार नोव्हेंबर 2022 मध्ये झाल्याचे देखील प्रमोद यांनी सांगितले. 


हेही वाचा : Kantara 2 मध्ये Urvashi Rautela ची एन्ट्री? उर्वशीच्या पोस्टनं एकच खळबळ


आता प्रमोद यांनी पोलिसात धाव घेतली असून त्यांनी राणा आणि त्याच्या वडिलांविरोधात तक्रार दाखल केली आहे. यासोबतच त्यानं खुलासा केला आहे की त्याला कोणत्याही प्रकारची भरपाई मिळालेली नाही. इतकंच काय तर जमीन खाली करण्यासाठी राणा आणि त्याच्या वडिलांनी प्रमोद यांना धमकावले. त्यामुळेच आता प्रमोद यांनी कोर्टात धाव घेतली आहे. त्यावर लवकरच सुनावणी देखील होणार आहे. 


प्रमोदचा दावा आहे की या घटनेनंतर ते सगळ्यात आधी बंजारा हिल्स पोलीस स्टेशनला संपर्क साधला, परंतु त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. प्रमोद यांनी आरोप केला की 'तो एक प्रसिद्ध सेलिब्रिटी आहे यामुळे त्याच्यावर कारवाई झाली नाही, याविषयी मला काही माहिती नाही. पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही, परंतु आता मला खात्री आहे की न्यायालय मला न्याय देईल.'


दरम्यान, राणा काही दिवसांपूर्वी ‘हाथी मेरे साथी’ या चित्रपटात दिसला होता. याशिवाय लवकरच तो नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील ‘राणा नायडू’ या वेबसीरिजमध्ये दिसणार आहे.