एकता कपूर आणि आई शोभा कपूर कायद्याच्या कचाट्यात, काय आहे प्रकरण?
निर्माती एकता कपूर आणि तिची आई शोभा कपूरवर POCSO कायद्याअंतर्गत गुन्हा का दाखल करण्यात आला... नेमकं प्रकरण काय...
Case Filed Against Ekta Kapoor Shobha Kapoor Pocso Act : निर्माती एकता कपूर आणि तिची आई शोभा कपूर विरोधात POCSO कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता हे प्रकरण कोणत्या गोष्टीवरून आहे असा प्रश्न तुम्हाला असेल तर हे सगळं प्रकरण OTT प्लॅटफॉर्म 'ऑल्ट बालाजी' ची वेह सीरिज 'गंदी बात' या सीरिजच्या 6 सीझनशी संबंधीच आहे. त्यांच्यावर जो आरोप करण्यात आला आहे की एका अल्पवयीन मुलीसोबतचे आक्षेपार्ह्य सीन्स दाखवण्यात आले आहेत. त्यामुळे आता हे दोघं कायद्याच्या कचाट्यात अडकले आहेत.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
बोरीवलीच्या योग टीचर स्वप्निल रेवाजी यांनी 2021 मध्ये MHB पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. असं म्हटलं जातं की फेब्रुवारी 2021 ते एप्रिल 2021 मध्ये ही सीरिज प्रदर्शित झाली होती आणि त्यात एका अल्पवनीय मुलीसोबत घाणेरडे सीन्स दाखवण्यात आले. या दाव्यानंतर MHB पोलिस स्टेशनमध्ये आयपीसीच्या कलम 295-A, IT कायद्याच्या कलम 13 आणि 15 आणि POCSO कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे
FIR मध्ये काय आहेत आरोप?
दरम्यान, ही तक्रार करणाऱ्या व्यक्तीनं बोरिवली कोर्टाचे दरवाजे देखील ठोठावले. FIR मध्ये आरोप करण्यात आला की ऑल्ट बालाजीवर प्रदर्शित झालेल्या या सीरिजमध्ये एका अल्पवयीनं मुलीचे अश्लील सीन्स दाखवण्यात आले. खरंतर, हे वादग्रस्त एपिसोड सध्या या अॅपवर आता प्रदर्शित होत नाही. तक्रर करणाऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे, त्या अल्पवयीन मुलीला अश्लील चित्रपट बनवताना आणि अश्लील संवाद करताना दाखवलं आहे. वेब सीरिजमध्ये शाळेतील यूनिफॉर्म परिधान केलेल्या अभिनेत्रींना देखील अश्लील गोष्टी करताना दाखवलं आहे. ज्यामुळे मुलांवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : नॉन व्हेजमुळे झाला निलम कोठारीचा घटस्फोट? म्हणाली, 'मला परदेशात नेऊन...'
या संपूर्ण प्रकरणात एकता कपूर आणि शोभा कपूर यांनी कोणत्याही वक्तव्य केलेलं नाही. ही कारवाई यामुळे झाली कारण 27 सप्टेंबर 2024 ला सुप्रीम कोर्टाचं एक मोठा निर्णय घेतला आहे. कोर्टानं मुलांशी संबंधीत अभ्रद कंटेटला घेऊन निर्णय सुनावला होता. ज्यात त्यानं असं म्हटलं होतं की मुलांसोबत अशा प्रकारचा कंटेट बनवणं, पाहण आणि डाउनलोड करणं हा गुन्हा आहे.