Aarti Mittal Arrested For Sex Racket: मुंबई क्राईम ब्रांच (mumbai crime branch) युनिटने सोमवारी फिल्म इंडस्ट्रीतील चालू असलेलं सेक्स रॅकेट (sex racket) चा पर्दाफाश केला आहे. क्राईम ब्रांचनुसार हे सेक्स रॅकेट कास्टिंग डायरेक्टर आरती मित्तल चालवत होती. सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरु आहे. पोलिसांनी सध्या कास्टिंग डिरेक्टर आरती मित्तलला (castin director aarti mittal) ताब्यात घेतलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरती मित्तल (aarti mittal) )ही एक कास्टिंग डिरेक्टर आहे. कास्टिंग डिरेक्टर (castin director) असण्यासोबतच आरती एक अभिनेत्रीही आहे. आरतीने आतापर्यंत बऱ्याच शोमध्ये काम केलं आहे. 'अपनापन' (apanapan) सारख्या शोमध्ये काम केलं आहे. सोशल मीडियावर (social media) आरती कायम सक्रिय असायची. काही दिवासंपुर्वी तिने आर माधवन (r.madhvan) सोबत सिनेमाचं शूट करत असल्याचं सोशल मीडिया पोस्टव्दारे सांगितलं होतं. या रॅकेटशी संबंधित अन्य लोकांचाही पोलिसांनी शोध सुरू केला आहे.


अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या रॅकेटची माहिती पोलिस निरीक्षक मनोज सुतार यांना मिळाली होती. यानंतर त्यांनी एक टीम तयार केली आणि त्यांनी आरतीकडे एक ग्राहक म्हणून ओळख करून दिली. नियोजनाचा एक भाग म्हणून, डमी ग्राहकाने मित्तलशी संपर्क साधला आणि त्याला तिच्या मित्रांसाठी दोन मुलींची व्यवस्था करण्यास सांगितलं. या कामासाठी मित्तलने 60 हजार रुपयांची मागणी केली होती. आरती विविध प्रोजेक्ट दरम्यान मॉडेल्सना वेश्याव्यवसायासाठी चांगल्या ऑफर देऊ करत असताना तिला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.


पोलिसांनी डमी ग्राहकांना हॉटेलमध्ये पाठवले होते.  क्राईम ब्राचंच्या पथकाने गोरेगावमधील एका ठिकाणाहून दोन मॉडेल्सची सुटका केली आहे. आणि त्यांना पुनर्वसन केंद्रात पाठवलं आहे. आरती मित्तलने त्या दोघींना 15,000 रुपये देणार असल्याचं सांगितलं होतं. असं पोलिसांनी सांगितलं. सध्या आरती पोलिसांच्या ताब्यात आहे. 



फिल्म इंडस्ट्रीमध्ये कास्टिंग काउचच्या अनेक घटना घडल्या आहेत आणि अनेक सेलिब्रिटींनीही याबाबत अनेकदा खुलासे केले आहेत.. पुरुष असो की महिला कास्टिंग काउचचा अनुभव घेतो आणि ते यातून कसे सुटले हे आपण पाहिलं आहे.