Rocky Aur Rani Ki Prem Kahaani :  बॉलिवूडचा लोकप्रिय दिग्दर्शक करण जोहरचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट याच महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची भलीमोठी स्टार कास्ट आहे. कोणताही चित्रपट हा प्रदर्शित होण्याआधी त्याला सेंट्रल बोर्ड फिल्म सर्टिफिकेशनकडून मान्यता मिळवणे गरजेचे असते. दरम्यान, 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाला देखील सेंट्रल बोर्ड फिल्म सर्टिफिकेशन (सीबीएफसी) नं समीक्षा केली. पण यावेळी त्यांनी चित्रपटातील डायलॉग्समध्ये बदल सुचवले आहेत. त्यातील काही शब्द हे अपमानकारक होते आणि त्यात एका रमच्या ब्रॅंडचं देखील नाव घेण्यात आलं होतं. त्यावर सेन्सॉरनं कात्री चालवली असं समोर आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटातून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या संबंधित असणारे संपूर्ण वाक्य काढून टाकण्यात आले आहे. समाचार पोर्टलनं दिलेल्यावृत्तानुसार, कपड्याच्या दुकानातील एक सीनमध्ये डायलॉग असून त्यात महिलांना अपमान होत असल्याचे म्हटले आहे. त्यातून 'ब्रा' शब्दाला 'आइटम' या शब्दासोबत बदलण्यास सांगितले आहे. चित्रपटातील आक्षेपार्ह आणि अपमानास्पद शब्द बदलून त्याजागी ‘बेहेन दी’ हा शब्द घेतला आहे. चित्रपटातील एका सीनमध्ये मद्यपानाच्या उल्लेखात ‘ओल्ड मॉन्क’ शब्द आला होता. याजागी ‘बोल्ड मॉन्क’ शब्द करण्यात आला आहे. यापूर्वी सेन्सॉरने शाहरुखच्या ‘पठाण’ चित्रपटात ‘स्कॉच’च्या जागी ‘ड्रिंक’ शब्द वापरण्यास सुचवले होते. ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटातील एका दृश्यात ‘लोकसभा’ हा शब्द वापरण्यात आला होता. हा शब्द सेन्सॉर बोर्डाने पूर्णपणे काढून टाकण्यास सांगितला. चित्रपटात रविंद्रनाथ टागोर यांच्या संबंधित एक सीन होता, ज्यामुळे ट्रेलर प्रदर्शित झाल्यावर वाद निर्माण झाला होता. या जागी फिल्टर टाकण्यात येणार आहे. तसेच रविंद्रनाथ टागोर यांचा उल्लेख चित्रपटातून हटवण्यात आला आहे.



चित्रपटात आलिया भट्ट ही राणी चॅटर्जी ही भूमिका साकरत असून ती पश्चिम बंगालची असल्याचे दाखवण्यात आले आहे. त्यामुळे चित्रपटात असलेलं मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या संबंधित संपूर्ण वाक्य काढून टाकण्यात आले आहे. ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ मधील एक सीन एका अंतर्वस्त्राच्या दुकानातील होता. या दृश्यातील महिलांविषयीचा अपमानास्पद शब्द काढून टाकण्यात आला आहे. याच सीनमध्ये ‘ब्रा’ या शब्दाऐवजी Item हा शब्द वापरण्यास सांगितले आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


या चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर रणवीर सिंगनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की "हा चित्रपट करण जोहरच्या करण जोहर एस्ट फिल्म आहे. हा चित्रपट पाहून 'कभी खुशी कभी गम' चा फील आपल्याला पुन्हा एकदा देतो. हा एक खूप गंभीर विषय आहे आणि त्यासाठी खूप प्रयत्न करण्यात आले आहेत. करण जोहर असा चित्रपट स्क्रिनवर घेऊन येणार आहे जे पाहून आपण मोठे झालो आहोत. हा आमच्या आयुष्याचा खूप मोठा भाग आहे."


हेही वाचा : स्वरा भास्करनं बेबी बंप फ्लॉन्ट करत शेअर केला व्हिडीओ, प्रेग्नंसी ग्लोनं वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष


दरम्यान, सेन्सॉरकडून चित्रपटाला बुधवारी 19 जुलै रोजी सेन्सॉर सर्टिफिकेट मिळालं आहे. हा चित्रपट 2 तास 48  मिनिटांचा आहे. दरम्यान, या चित्रपटात रणवीर सिंग, आलिया भट्ट, दिग्गज अभिनेते धर्मेंद्र, जया बच्चन आणि अभिनेत्री शबाना आझमी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.