Vidya Balan : बॉलिवूड अभिनेत्री सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. सध्या अभिनेत्री बहुतांशी चित्रपट पडद्यावर दिसत नाही. परंतु विद्या बालन ही रील्स बनवण्यात व्यस्त असते. तिचे रील्स देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. विद्या बालन जिकडे जाईल तिकडे मस्तीचे वातावरण तयार होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकताच अभिनेत्री विद्या बालनचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये ती सीआयडीशी बोलताना दिसत आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घ्या सविस्तर


व्हायरल व्हिडीओमध्ये काय? 


सध्या विद्या बालनचा एक रील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये विद्या बालन सीआयडीच्या एका मजेशीर व्हिडिओवर काम करताना दिसत आहे. विद्या दरवाज्यासमोर खुर्चीवर बसून सेल्फी घेण्यासाठी पोज देताना दिसत आहे. तेवढ्यात कोणीतरी दरवाजा ठोठावतो. त्यानंतर विद्या विचारते, कोण आहे? उत्तर येते, सीआयडी, आम्हाला तुमच्याशी बोलायचे आहे.


यानंतर विद्या म्हणते, तुम्ही किती लोक आहात? तिकडून उत्तर येते की तीनजण आहोत. यावर विद्या म्हणते, मग एकमेकांशी बोला, माझ्याकडे वेळ नाही आणि पुन्हा मोबाईलवर सेल्फी काढू लागते. विद्याचा हा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. चाहत्यांसोबत चित्रपट कलाकारही विद्याच्या टॅलेंटचे कौतुक करताना दिसत आहेत. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

कॅप्शन चर्चेत 


अभिनेत्री विद्या बालनने या व्हिडीओमध्ये काळ्या रंगाची साडी परिधान केली आहे. ज्यामध्ये ती रील्स व्हिडीओ बनवत आहे. दरवाज्यासमोर खुर्चीवर बसून ते हा रील्स बनवत आहे. अभिनेत्रीने तिचा हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केलाय. या व्हिडीओला तिने 'सेल्फी लेना मेरा काम है' असं कॅप्शन दिलं आहे. तिच्या या कॅप्शनची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे. तिच्या या व्हिडीओ देखील मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे. 


 


दो और दो प्यार


अभिनेत्री विद्या बालन नुकतीच 'दो और दो प्यार' मध्ये दिसली होती. या चित्रपटात विद्या प्रतीक गांधीसोबत दिसली होती. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार काही कमाई करू शकला नाही. परंतु विद्याला मोठ्या पडद्यावर पाहून चाहत्यांना आनंद झाला आहे.