सुशांतसिंहच्या घराची सीबीआय टीमकडून तपासणी, एनसीबीकडून रियाला समन्स
सीबीआयच्या टीमकडून सुशांतसिंह याच्या घरात कसून तपास करण्यात आला. सव्वा तास सीबीआयची टीम पुन्हा एकदा सुशांतसिंह याच्या घरी तपास करत होती.
मुंबई : सीबीआयच्या टीम सुशांतसिंह राजपूत याच्या घरी तपासासाठी गेली होती. सव्वा तास सीबीआयची टीम पुन्हा एकदा सुशांतसिंह याच्या घरी तपास करत होती. यावेळी सुशांतची बहिण मितू सिंह उपस्थित होती. दरम्यान, ड्रग्ज कनेक्शनबाबतच्या चौकशीसाठी शोविक चक्रवती आणि सॅम्युअल मिरांडा यांच्या सात दिवसांच्या कस्टडीची एनसीबीने मागणी केली आहे. वकिल मानेशिंदे यांनी यावर आक्षेप घेतला आहे. तर रिया चक्रवर्तीची उद्या होणार चौकशी होणार आहे. याबाबत एनसीबीकडून आज समन्स पाठवणार आहे.
सीबीआय टीम आज पुन्हा एकदा सुशांतच्या वांद्रेतल्या घरी चौकशीसाठी गेले होते. यावेळी सीबीआय टीमसोबत सुशांतची बहीण मितू सिंहही सुशांतच्या फ्लॅटवर हजर होती. नीरज, केशव, सिद्धार्थ पिठाणीही यावेळी फ्लॅटवर हजर होते. सीबीआयने पुन्हा एकदा १४ जूनच्या त्या दिवसाबाबत मितू आणि घरातल्या सदस्यांची चौकशी केली असून १४ जूनच्या दिवसाचं रिक्रिएशन केले आणि सीबीआय टीम निघून गेली.
सुशांतसिंह प्रकरणात 'झी मीडिया'ला मिळालेल्या माहितीनुसार एनसीबीच्या एफआयआरमध्ये ड्रग्ज खरेदी आणि वापराचा उल्लेख आहे. तसेच एफआयआरमध्ये रिया चक्रवर्तीच्या ड्रग्ज वापरासंबंधीच्या चॅटचाही उल्लेख आहे. एनडीपीएस कायद्यांतर्गत कलमे लावण्यात आली आहे.
ड्रग्ज कनेक्शन तपासात काय आले समोर
- केपीएस मल्होत्रांची एनसीबी तपासात महत्त्वाची भूमिका
- पुराव्यावरूनच शौविक, सॅम्युअल मिरांडा यांची अटक
- दोघांबाबत डिजिटल पुरावे मिळाले
- याप्रकरणी छाप्यात पैसेही सापडले
- जैद आणि त्याचे साथीदार लॉजिस्टिक चेनमध्ये सहभागी
- ड्रग्ज आणि ड्रग्जचा काळाबाजार कुठे आहे हे तपासणार
- शौविक, सॅम्युअलने दिलेल्या माहितीच्या आधारे पुढची पावलं
- केवळ बॉलिवूड टार्गेट नसून जे ड्रग्ज खरेदी करतात तिथेही लक्ष देणार
दरम्यान, सीबीआय करत असलेल्या चौकशीला मुंबई पोलीस पूर्णपणे सहकार्य करत असल्याचं वक्तव्य गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे. मात्र ड्रग्ज कनेक्शनबाबत अनिल देशमुखांनी अद्याप मौन बाळगले आहे.