मुंबई : बॉलिवूड स्टार्स अनेकदा लग्नसमारंभात परफॉर्म करताना दिसतात. अभिनेता शाहरुख खानपासून ते अभिनेत्री प्रियंका चोप्रापर्यंत अनेक जण लग्नाच्या फंक्शन्समध्ये डान्स करताना दिसले आहेत, पण तुम्हाला माहित आहे का की हे स्टार्स लग्न किंवा कोणत्याही फंक्शनमध्ये परफॉर्म करण्यासाठी कोट्यवधी रुपये घेतात. तर हे स्टार लग्नात डान्स करण्यासाठी किती पैसे घेतात, हे जाणून घेवू...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेता सलमान खान


बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खान लग्नाच्या एका कार्यक्रमात डान्स करण्यासाठी 2 कोटी रुपये घेतो.


अभिनेता शाहरुख खान
आमच्या पार्टनर वेबसाइट बॉलीवूड लाईफनुसार, शाहरुख खान लग्नात किंवा इतर कार्यक्रमांमध्ये डान्स करण्यासाठी 3 कोटी रुपये घेतो.


अभिनेता अक्षय कुमार
डीएनएच्या रिपोर्टनुसार, अक्षय कुमार लग्नात किंवा इतर कार्यक्रमांमध्ये डान्स करण्यासाठी अडीच कोटी रुपये घेतो.


अभिनेता कतरिना कैफ
'टायगर जिंदा है' फेम अभिनेत्री कतरिना कैफ लग्नात परफॉर्म करण्यासाठी मोठी रक्कम घेते. रिपोर्टनुसार, कतरिना 3.5 कोटी रुपये फी घेते.


अभिनेत्री प्रियंका चोप्रा
प्रियांका चोप्रा लग्नाच्या फंक्शनमध्ये परफॉर्म करण्यासाठी सुमारे 2.5 कोटी रुपये घेते.