मुंबई : एकदा सेलिब्रेटी झाल्यावर कमाईचे काही मोजमापच नसते. तुमच्यासाठी संपत्तीची दारे जवळपास खुली होतात. असेच काही सेलिब्रेटी आहेत ते फक्त जाहिरातीतून कोट्यावधी रुपये कमावतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय सेलिब्रिटीज जाहिरातींद्वारे किती पैसे कमावतात, हे कॉर्पोरेट फायनांन्स अॅडव्हटायझर डफ अॅँड फेल्प्सच्या अहवालात जाहिर करण्यात आहे. इंडियाज मोस्ट व्हॅल्युअेबल सेलिब्रेटी ब्रॅंड्स या नावाने ही यादी जाहिर केली आहे. या यादीत विराट कोहली प्रथम स्थानी आहे. 


टॉप ५


  • एका जाहिरातीतून विराट कोहली सुमारे ५ कोटी रुपये कमावतो. त्याच्या या कमाईचा आकडा सामान्यांना अचंबित करणारा आहे. जाहिराती आणि ब्रॅँड अंडोर्समेंट करुन तो वर्षाला १४४ मिलियन डॉलर इतकी कमाई करतो.

  • या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे किंग खान शाहरुख खान. जाहिरातीतून तो वर्षाला सुमारे १०६ मिलियन डॉलर इतकी कमाई करतो. 

  • या यादीतील तिसरे नाव आहे अभिनेत्री दीपिका पदुकोणचे. तिची ब्रॅंड व्हल्यू ९३ मिलियन डॉलर आहे.

  • चौथ्या स्थानी आहे खिलाडी अक्षय कुमार. जाहिरातीतून तो ४७ मिलियन डॉलर इतकी कमाई करतो.

  • ४२ मिलियन डॉलर इतकी कमाई करत अभिनेता रणवीर सिंग या यादीत पाचव्या स्थानी आहे. 


यांचाही समावेश


या यादीत एकूण १५ सेलिब्रेटींचा समावेश आहे. त्यात भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी आणि शटलर पी.व्ही. सिंधूच्या नावांचाही समावेश आहे. हे सेलिब्रेटींज फक्त मेनस्ट्रीम जाहिराती नाही तर सोशल मीडिया अकाऊंटवरही ब्रॅँड्सचे प्रमोशन करतात.