मुंबई : (naga Chaitanya and Samantha Ruth Prabhu ) दाक्षिणात्य कलाजगतातील स्टार कपल अशी ओळख असणाऱ्या अभिनेता नागा चैतन्य आणि अभिनेत्री समंथा रुध प्रभू यांनी 2021 मध्ये त्यांच्या वैवाहिक नात्याला पूर्णविराम दिला. काही दिवसांचे मतभेद आणि त्यानंतर विकोपास गेलेल्या काही कारणांमुळे समंथा आणि नागा चैतन्य या निर्णयावर पोहोचले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घटस्फोटानंतर समंथा काही काळातच तिच्या कामावर लक्ष केंद्रीत करु लागली. वेळप्रसंगी सोशल मीडियावरून व्हायरल होऊ लागली. नागा चैतन्य मात्र त्याच्या खासगी आयुष्यावर फार मोकळेपणानं बोलताना दिसला नाही. 


नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मात्र त्यानं या नात्यावर वक्तव्य करत सर्वांच्या नजरा वळवल्या. 'आम्हा दोघांना जे काही बोलायचं होतं ते आम्ही आमच्या परीनं जाहीर केलेल्या पत्रकामध्ये बोललो. खासगी आयुष्यासोबत मी कायम असंच केलं आहे. ज्या गोष्टींची मांडणी करणं कठीण आहे अशा मुद्द्यांची माहिती मी माध्यमांना देतो, मग ते चांगलं असो किंवा वाईट', असं तो म्हणाला. 


घटस्फोटाच्या मुद्द्यावर यावेळी मात्र जरा जास्तच स्पष्ट बोलताना समंथा या तिच्या आयुष्यात बरीच पुढे गेली आहे, मीसुद्धा पुढे आलो आहे... पण मला नाही वाटत की संपूर्ण जगाला मी याहून जास्त काही सांगण्याची गरज आहे; असं म्हणत त्यांनी आपली बाजू सर्वांसमोर मांडली. 


कुटुंब आणि मित्रपरिवाराला याची माहिती असल्याचं सांगताना एक बातमी गेली की त्या ठिकाणी दुसरी येते असं वास्तव त्यानं सर्वांसमोर आणलं. सध्याच्या सर्व चर्चा, बातम्या तथ्यहिन असल्याचं म्हणत यावर मी जितका जास्त व्यक्त होईन तितक्या जास्त चर्चा होतील अशी मनातली भीतीही त्यानं व्यक्त केली. येत्या काही दिवसांत या चर्चाही धुसर होतील, असं म्हणत त्यानं या प्रकरणाला पूर्णविराम दिला.