मुंबई : दर दिवसाला बहुविध कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येतात. अशाच कार्यक्रमांमध्ये प्रेक्षकांना विविध पर्यायही सहज उपलब्ध होतात. देश आणि परदेशातील कार्यक्रमांच्या उपलब्धतेमध्येच सध्या चर्चा होत आहे ती सेलिब्रिटी शेफ गॉर्डन रामसेच्या एका कार्यक्रमाची. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'ऑस्ट्रेलियन मास्टरशेफ' या कार्यक्रमाच्या परीक्षकपदी असणाऱ्या गॉर्डन रामसेची चर्चा सध्या सुरु आहे खरी. पण, या चर्चेमुळे तो वादाच्या भोवऱ्यातही अडकला आहे.  Gordon Ramsay: Uncharted या कार्यक्रमाच्या नव्या भागादरम्यान, गॉर्डन हा एका बकऱ्याला मारताना दिसत असून, तो त्याच बकऱ्याला शिजवून बेरी चटनी आणि सॅलडसोबत त्याचा आस्वादही घेताना दिसत आहे. 



रामसेची हीच कृती प्राणीप्रेमींना खटकली असून, त्याच्यावर अनेकांनीच आक्षेप घेतला आहे. PETA कडून रामसेवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात येत आहे. न्यूझीलंड येथे या भागाचं चित्रीकरण करण्यात आलं आहे. ज्यामध्ये शेफ Monique Fiso ने त्यावा रान बकऱ्याला मारण्यास सांगितलं होतं. असं असलं तरीही टीकेची झोड मात्र रामसेवरच उठत आहे. 





रामसेच्या या कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनीच त्याला हे मानवी कृत्य करत असल्याचं म्हणत निशाण्यावर घेतलं आहे. यापूर्वीही रामसे PETAची खिल्ली उडवल्यामुळे चर्चेत आला होता. पण, यावेळची परिस्थिती पाहता त्याच्या कार्यक्रमाच्या टीआरपीवरही परिणाम होण्याची चिन्हं आहेत.