मुंबई : आपल्या जगभरातील प्रेक्षकांना अप्रतिम टॅाक शो, ट्रॅव्हल शो दिल्यानंतर प्लॅनेट मराठी आता आपल्या प्रेक्षकांसाठी आणखी एक जबरदस्त नॅान फिक्शनल शो घेऊन सज्ज झाले आहे. 'उभ्या उभ्या' असे या स्टँडअप शोचे नाव असून मराठी ओटीटीवरील हा पहिलावहिला मराठी सेलिब्रिटी स्टँडअप कॉमेडी शो आहे. यात इन्फ्लुएन्सर्स, सेलेब्रिटी आणि सुप्रसिद्ध असे स्टॅण्डअप कॉमेडिअन्सही आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रत्येक शुक्रवारी याचे तीन एपिसोड्स प्रदर्शित होणार असून  यात महेश मांजरेकर, दिग्दर्शक विजू माने, क्रांती रेडकर, आशय कुलकर्णी, बॉईज फेम पार्थ भालेराव, सा कलाकारांसह सिद्धांत सरफरे, कोकण हार्टेड गर्ल अंकिता प्रभू वालावलकर, आरजे प्रणित, निनाद गोरे, अनिश गोरेगावकर, श्रुतिक कोळंबेकर, योगेश शिंदे असे नावाजलेले कन्टेंट क्रिएटरही झळकणार आहेत. यातील काही सेलिब्रिटी पहिल्यांदाच हा प्रयोग करणार आहेत. झेन एंटरटेंनमेंट निर्मित या शोचे दिग्दर्शन श्रवण अजय बने यांनी केले आहे. 
 
निखळ मनोरंजन हे या शोचे मुख्य उद्दिष्ट्य असून 'उभ्या उभ्या' हा शो प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रेक्षकांना आता पाहाता येणार आहे. हा शो म्हणजे प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा डोस आहे, जो सर्व वयोगटातील प्रेक्षकांसाठी एक आनंददायी अनुभव असणार आहे. अभिनेते, डिजिटल संवेदना आणि स्टँडअप उस्तादांसह 12 कलाकारांचा समावेश असलेला, हा शो एक हास्याने भरलेला राइड बनण्यासाठी सज्ज आहे जो प्रेक्षकांना विभाजित करेल.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


 


प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, "कॉमेडी हा प्रकार आव्हानात्मक असतो, परंतु जर तो चोखपणे साकारला तर त्यातून निखळ मनोरंजन होते. असाच आमचा छोटासा प्रयत्न आम्ही 'उभ्या उभ्या' शो मधून घेऊन आलो आहोत. त्यात प्रेक्षकांच्या लाडक्या कलाकारांचा समावेश असल्याने ते नक्कीच एन्जॉय करतील. ही १२ भागांची सीरिज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी हा आमचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे प्रेक्षकांना ही सीरिज बघताना मजा  येणार आहे.'' 'उभ्या उभा', एक सेलिब्रिटींनी भरलेला स्टँडअप कॉमेडी शो जो हास्य आणि मनोरंजनाचा दंगल असेल. ही मालिका 1 मार्च 2024 पासून प्लॅनेट मराठी OTT वर प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.