मुंबई : सिनेमा दिग्दर्शक आणि सेंसर बोर्डातील वाद हे अगदी जगजाहीर आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यूड आणि एस दुर्गा सारख्या सिनेमांसोबत झालेल्या वादानंतर आता सेंसर बोर्डाकडे आणखी एक सिनेमा फसला आहे. बिसाहडा कांडच्या पार्श्वभूमीवर आधारित 'द ब्रदरहुड' हा सिनेमा सेंसर बोर्डाकडे अडकला आहे. दिग्दर्शकाच्या म्हणण्यानुसार हा सिनेमा सांप्रदायिक सद्भावला प्रस्तापित करते. सेंसर बोर्डाने या सिनेमातून ३ दृश्यांवर कैची फिरवण्यास सांगितले आहे. निर्मात्यांच्या म्हणण्यानुसार हे ३ दृश्य सिनेमातील जान आहेत. 'द ब्रदरहुड' हा सिनेमा दादरीत गोमांस ठेवण्याच्या मुद्यावरून मोहम्मद अखलाक याला पडकून पकडून मारून त्याची हत्या केली होती. 


खऱ्या गोष्टीवर आधारित सिनेमा 


या सिनेमात असं दाखवण्यात आलं आहे की, ग्रेटर नॉएडाच्या दोन गावांमध्ये एकाच गोत्राचे लोक राहतात. एका गावात मुस्लिम समाजाचे लोकं राहतात तर दुसऱ्या गावात हिंदू समाजाचे लोक राहतात. या सिनेमात असं दाखवण्यात आलं आहे की, अखलाख हत्याकांडामुळे समाजावर कसा विपरीत परिणाम झाला आहे हे दाखवण्यात आलं आहे. मात्र लोक या मुद्यावरून राजकारण करत आहेत. या सिनेमाचे निर्माता आणि पत्रकार पंकज पाराशरने सांगितले की, हे तीन दृष्य कापण्यास सेंसर बोर्डाने आम्हाला सांगितले आहे.