मुंबई : महाराष्ट्राच्याच नव्हे तर, देशाच्याही राजकारणातील एक महत्त्वाचं नाव म्हणून उल्लेख केल्या जाणा़ऱ्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित एक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाच्या बऱ्याच चर्चांना उधाण आलं असून, याच वातावरणात ठाकरेचा ट्रेलर प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. पण, त्यापूर्वीच तो सेन्सॉरच्या कचाट्यात सापडला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संजय राऊत यांची निर्मिता असणाऱ्या या चित्रपटातील काही संवादांवर आणि दृश्यांवर सेन्स़रकडून आक्षेप घेण्यात आला आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होण्याच्या अवघ्या काहीच तासांपूर्वीच हा प्रकार समोर आला असला तरीही ट्रेलर प्रदर्शित होणारच अशा ठाम भूमिक शिवसेना नेते आणि चित्रपटाचे निर्माते संजय राऊत यांनी दिली आहे. 


दाक्षिणात्यांविरोधात शिवसेनेच्या आंदोलनादरम्यान यांडुगुंडू या शब्दाचा वापर करण्यात आला होता. ज्याचा उल्लेख चित्रपटात असल्याचं सांगण्यात येत असून त्यावर सेन्स़ॉरने आक्षेप घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. चित्रपटातील एकूण तीन संवाद आणि काही दृश्यांवर सेन्सॉरने हरकत दर्शवली असून, आता यावर चित्रपटाच्या टीमकडून कोणती भूमिका घेतली जाणारा हे पाहायला मिळणार आहे. 


बाबरी मशिद प्रकरणीच्या एका दृश्यामुळेही चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचं वृत्त आहे. अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकी या चित्रपटात मध्यवर्ती भूमिकेत झळकणार असून बाळासाहेब ठाकरे यांच्या वादळी व्यक्तीमत्वाचं शिवधनुष्य तो पेलतो का, हे येत्या काळात कळेलच. 


शिवसेना या राजकीय पक्षाचं राजकारणातील आणि सर्वसामान्य जनतेच्या मनातील स्थान, शिवसैनिकांची उत्सुकता आणि प्रेक्षकांचं कुतूहल पाहता ठाकरे ब़ॉक्स ऑफिसवर प्रदर्शनापूर्वीच चर्चेचा विषय ठरत आहे. त्यातही तगड्या कलाकारांची आणि कथानकाची साथ असल्यामुळे येत्या काळात हे वादळ रुपेरी पडद्यावर कितपत प्रभाव पाडणार याकडेच साऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे.