मुंबई  :  विदर्भाचा चेहारा म्हणून भारत गणेशपुरे यांच्याकडे बघितलं जातं, अनुशेष आहे इंडस्ट्रीमध्ये विदर्भाचा? असा प्रश्न भारत गणेशपुरेला केला असता. "थोडा माझ्या निमित्ताने भरुन निघाला असे समजू...."असे तो हसत म्हणाला. त्यानंतर त्याने विदर्भाच्या वऱ्हाडी भाषेवर बोलताना भरतने सांगितले. "विदर्भाची वऱ्हाडी भाषा आतापर्यंत तर इंडस्ट्रीमध्ये नव्हतीच. हे भाग्य लाभलं आमच्या वाटेला की, आमच्यामुळे ही भाषा इंडस्ट्रीमध्ये आली. (हा संपूर्ण व्हीडिओ पाहा बातमीच्या शेवटी)

झी मराठीचे आभार

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झी मराठीचे आभार मानतो की, त्यांनी आम्हाला फ्रीडम दिला. त्यांच्या क्रिएटिव्ह लोकांनी आम्हाला संधी दिली या भाषेमधून आमची कला सादर करण्याची. झी मराठीचं खास कौतुक आहे की, त्यांनी या भाषेला पुढे आणण्यास मदत केली.

चला हवा येऊ द्या या झी मराठीवरील मालिकेने अवघ्या मराठी माणसांची मनं जिंकली आहेत, त्यांना मनापासून हसायला लावलं आहे. असं म्हणू या की हसवून हसवून त्यांनी अनेकांचे चांगले चांगले आजार पळवून लावले असतील. अशा माणसांनी ज्यांना महाराष्ट्राला भरभरुन हसवलं, डोळ्यातून पाणी येईपर्यंत हसवलं अशा सर्व कलाकारांशी बातचित केली आहे, झी २४ तासचे संपादक निलेश खरे यांनी. कलाकारांनी त्यांच्या आयुष्यातील काही भन्नाट किस्से सांगितले आहेत.