मुंबई : अभिनेता भाऊ कदम याच्या झोपेविषयी अनेक चर्चा हवा येऊ द्या च्या सेटवर होत असतात त्याबद्दल विचारले असता श्रेया बुगडेने खुलासा केला की, "आता वेळ नाही म्हणून भाऊ झोपू शकत नाही. पण त्याला  इतकी झोप आहे की, तो कधीही कुठेही झोपू शकतो. परंतू इतकी झोप ही सुखी माणसाचं लक्षण आहे एवढ मात्र नक्की."


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


चला हवा येऊ द्या,  या झी मराठीवरील मालिकेने अवघ्या मराठी माणसांची मनं जिंकली आहेत, त्यांना मनापासून हसायला लावलं आहे. असं म्हणूया की हसवून हसवून त्यांनी अनेकांचे चांगले चांगले आजार पळवून लावले असतील. अशा माणसांनी ज्यांना महाराष्ट्राला भरभरुन हसवलं, डोळ्यातून पाणी येईपर्यंत हसवलं अशा सर्व कलाकारांशी बातचित केली आहे, झी २४ तासचे संपादक निलेश खरे यांनी. कलाकारांनी त्यांच्या आयुष्यातील काही भन्नाट किस्से सांगितले आहेत.