मूंबई : चला हवा येऊ द्या, या झी मराठीवरील मालिकेतील कलाकरांनी सुरवातीच्या काळात खूप स्ट्रगल केला होता. त्याबद्दल जाणून घेताना भाऊ कदमला प्रश्न केला की
स्ट्रगलच्या काळातील आणि आताच्या काळातली आईची प्रतिक्रिया काय आहे? त्यावर भाऊ कदमने सांगितले की, "ती स्वप्न बघत आहे असे तिला वाटतं, तिला अपेक्षाच नव्हती, की इतक्या लवकर यश मिळेल, गाडी घेता येईल आणि असं कधी घडलंच नव्हतं घरामध्ये, साधी सायकल मागितली तरी मिळायची नाही. त्यामुळे आईला आता काळजी वाटते की, कसं गाडीचे हफ्ते भरले जाणार वैगरे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण भाऊ कदम समाधान व्यक्त करताना म्हणतो, "आईला खूप बरं वाटतं, समाधान मिळतं अस सगळं पाहून. त्यामुळे मला ही वाटत की, आईसाठी काही तरी करावं. मग जेव्हाही वेळ मिळतो तेव्हा आईला आणि फॅमिलीला घेऊन कुशल आणि मी फिरायला जातो. आईला चालता येत नाही, परंतू तिला व्हीलचेअरवर घेऊन, मी नेहमी पिकनिकला जातो."



चला हवा येऊ द्या, या झी मराठीवरील मालिकेने अवघ्या मराठी माणसांची मनं जिंकली आहेत, त्यांना मनापासून हसायला लावलं आहे. असं म्हणूया की हसवून हसवून त्यांनी अनेकांचे चांगले चांगले आजार पळवून लावले असतील. अशा माणसांनी ज्यांना महाराष्ट्राला भरभरुन हसवलं, डोळ्यातून पाणी येईपर्यंत हसवलं अशा सर्व कलाकारांशी बातचित केली आहे, झी २४ तासचे संपादक निलेश खरे यांनी. कलाकारांनी त्यांच्या आयुष्यातील काही भन्नाट किस्से सांगितले आहेत.