मुंबई : थुकरटवाडीतील प्रत्येक विनोदवीर रसिकांना आपले दुःख विसरून  हसण्यास भाग पाडतो. त्यामुळे या कार्यक्रमाच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे. नेहमी आपल्या विनोदी कौशल्याने प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा कॉमेडी अभिनेता अंकुर वाढवे सध्या अत्यंत आनंदी आहे. त्याच्या घरी एका नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. अंकुरला कन्यारत्नाची प्राप्ती झाली आहे. ही गोड बातमी त्याने खुद्द सोसल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इन्स्टाग्रामवर त्याने त्याच्या चिमुकलीचा फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये 'कालच्या दिवशी एका नव्या पात्रात केला आहे. आता एका मुलीचा बाप झालोय.' असं लिहित त्याने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहे.



दरम्यान, गेल्या वर्षी अंकुरचा विवाह पार पडला. कोर्ट मॅरेज करत त्याने त्याच्या नव्या आयुष्याला सुरूवात केली. आता त्याच्या आयुष्यात नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. त्यामुळे तो प्रचंड आनंदी आहे. तो अभिनेत्यासोबत उत्तम कवी देखील आहे.