मुंबई : 'वीणा वर्ल्ड सोबत जगभर चला हवा येऊ द्या' जगभरातील प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. नेहमीच प्रेक्षकांना हसवणाऱ्या 'चला हवा येऊ द्या'च्या नव्या एपिसोडमध्येही अशाच प्रकारे हास्यकल्लोळ पहायला मिळणार आहे. सोमवार आणि मंगळवारच्या या भागात पुन्हा एकदा धमाल आपल्याला पाहायला मिळणार आहे.


(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यंदाच्या नव्या एपिसोडमध्ये थुकरटवाडीत राजकारणी अवतरले आहेत. झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यात अनेक सिनेमांना गौरवण्यात आलं. त्याच विषयावर चर्चा करण्यासाठी 'सवाल माझा ऐका' या थुकरटवाडीच्या LIVE कार्यक्रमात गेस्ट पोहचले आहेत.


थुकरटवाडीच्या या कार्यक्रमात आलेले गेस्ट हे ठरवणार आहेत कुठला सिनेमा बेस्ट?. या भागात राजकीय नेते आणि पक्षांवर मिश्कील टीका करण्यात आली आहे. यामध्ये नारायण राणे, उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांचं नाव न घेता विद्यमान राजकीय स्थितीवर तिरकस भाष्य करण्यात आलं आहे.



VIDEO: 'चला हवा येऊ द्या' च्या सेटवर 'बाणे' साहेबांनी गायलं 'सोनू... माझ्याशी गोड बोल'