Chala Hawa Yeu Dya | सागर कारंडे याने शिक्षणाप्रमाणे हे काम केलं असतं, तर फोटोत दिसतंय तसं घडलं असतं...
लहानपणापासून मला अभिनयाची आवड होतीच. शाळेत असताना अगदी इतिहासातल्या पुस्तकातून एखादा छोटा भाग घेऊन मी त्यावर अभिनय करायचो.
मुंबई : चला हवा येऊ द्या या झी मराठीवरील मालिकेने अवघ्या मराठी माणसांची मनं जिंकली आहेत, त्यांना मनापासून हसायला लावलं आहे. असं म्हणू या की हसवून हसवून त्यांनी अनेकांचे चांगले चांगले आजार पळवून लावले असतील. अशा माणसांनी ज्यांना महाराष्ट्राला भरभरुन हसवलं, डोळ्यातून पाणी येईपर्यंत हसवलं अशा सर्व कलाकारांशी बातचित केली आहे, झी २४ तासचे संपादक निलेश खरे यांनी. कलाकारांनी त्यांच्या आयुष्यातील काही भन्नाट किस्से सांगितले आहेत.
सागर कारंडे याने इंजीनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं आहे, यावर सर्व हसले...
सागर तू इंजीनीअरींगचे शिक्षण पूर्ण करत आपल्यातला अवलीपणा, तुला जपण कसं शक्य झालं? असा प्रश्न झी २४ तासचे संपादक निलेश खरे यांनी सागर कारंडेला विचारला तेव्हा सागरने इंजीनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलंय, यावर सागरसह सर्वच हसत होते.
यावर सागर म्हणतो, "लहानपणापासून मला अभिनयाची आवड होतीच. शाळेत असताना अगदी इतिहासातल्या पुस्तकातून एखादा छोटा भाग घेऊन मी त्यावर अभिनय करायचो."
गणशोत्सेव स्टेजवरून अभिनयाची चटक
माहिमच्या कॉलनीत गणेशोत्सवापासून ते अगदी सत्यानरायणाच्या पुजेपर्यंतचे कार्यक्रम आणि स्पर्धा असायच्या, तेथे नेहमीच एक स्टेज असायचा मग त्यात वेशभूशा असेल, गायनाचा कार्यक्रम असेल सगळ्यात सागर सहभाग घ्यायचा. त्यामुळे अगदी लहान असल्यापासून आपल्याला अभिनयाची आवड निर्माण झाली होती, असे सागर कारंडेने सांगितले.
लोकांसमोर जायला आवडायला लागलं
पुढे तो म्हणाला की, मला अभिनयामुळे प्राईझेस मिळायचे, लोकं पसंत करायचे, माझ्यासाठी टाळ्या वाजवायचे, त्यामुळे मनात एक हाव निर्माण झाली आणि मलाही लोकांसमोर जायला मस्त वाटायचे. पण वडिलांचं म्हणलं होते की आधी शिक्षण पूर्ण करावं."
वडिलांनी सांगितलं शिक्षणंही पूर्ण कर
वडील त्याला म्हणाले इंजीनीअरींग आधी पूर्ण कर, आयुष्यात शिकलेलं काहीच वाया जात नाही. याच क्षेत्रातले नाही तर अगदी माथाडी कामगारांचे काम केले तरी ते कधी ही वाया जाणार नाही. त्यामुळे शिक्षण घे मग काय करायचे आहे ते कर. मग सागरला ही ती गोष्ट पटते म्हणून मग त्याने शिक्षण पूर्ण केले, नंतर नोकरी ही केली. पण नंतर मग कालांतराने त्याने ती सोडली आणि मग 2002 ला पूर्णपणे तो या क्षेत्रात आला.