मुंबई : सध्या सोशल मीडियावर एक ट्रेण्ड सुरुये. ज्यात कलाकारांच्या बालपणीचे फोटो शेअर केले जातात आणि ते फोटो तुम्हाला ओळखण्याचं चॅलेंज दिलं जातं. आता नुकताच एका अभिनेत्रीच्या बालपणीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो तुम्हाला ही अभिनेत्री कोण आहे हे चॅलेंज दिलं जात आहे. खरंतर या अभिनेत्रीने तिच्या बालपणीचे फोटो सोशल मीडियावर स्वत: शेअर केले आहेत. बालदिनानिमीत्त हे फोटो अभिनेत्रीने शेअर केले होते. हे फोटो शेअर करताच ते व्हायरल होऊ लागले आहेत. आता तुम्हीही विचारात पडला असाल ना. की समोर आलेले  हे फोटो नेमके कोणत्या अभिनेत्रीचे आहेत. तर आज आम्ही तुम्हाला या अभिनेत्री बद्दल सांगणार आहोत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समोर आलेल्या फोटोतली अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून  अभिनेत्री अमृता खानविलकर आहे. ही अभिनेत्री नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर अमृताचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. अमृताने एखादी पोस्ट शेअर करताच ती व्हायरल होऊ लागते. नुकताच अमृताने तिच्या लहानपणीचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत तिच्यासोबत तिची बहिणही दिसत आहे. चाहत्यांना तिच्या बालपणीचा हा फोटो प्रचंड आवडला आहे. अनेकांनी तिच्या या फोटोवर लाईक्स कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अनेकजण आधी या अभिनेत्रीला ओळखताना गोंधळलेले दिसले आहेत मात्र अनेकांनी तिला एका नजरेत ओळखलं आहे.


अनेकांनी तिच्या या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका चाहत्याने कमेंट करत लिहीलं की, So Adorable तर अजून एकाने लिहीलंय, किती गोड  गॉड ब्लेस यु. तर अजून एकाने लिहीलंय, one of the best actorest माझी सगळ्यात फेवरेट अभिनेत्री. तर अनेकांनी या फोटोवर हार्ट ईमोजी शेअर केले आहेत. या फोटोचं चाहत्यांकडून प्रचंड कौतुक होताना दिसत आहे.



अमृताचं वर्कफ्रंट
'वाजले की बारा' या लावणीने अमृता घरा घरात पोहचली. याआधी अमृता 'चंद्रमुखी' सिनेमात झळकली होती. तर लवकरच अमृताचा 'कलावती' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तिचा हा सिनेमा पाहण्यासाठी तिचे  चाहते कमालीचे उत्सुक आहेत.