नवी दिल्ली : भाजपा मोदी ब्रॅण्डच्या विश्वासावर पुन्हा एकदा २०१९ चा रणसंग्राम जिंकण्याच्या तयारीत आहे. निवडणुकीला १० महिन्यांचा अवधी शिल्लक असताना भाजपाची तयारी सुरू देखील झालीयं. याच दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जिवनाशी संबंधित सिनेमा रिलीज होतोयं. लोकसभा निवडणुकीआधी हा सिनेमा रिलीज करणं हे भाजपा रणनितीचा एक भाग आहे.


भाजपाची टीम प्रमोशनला 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'चलो जीते है' हा नरेंद्र मोदी यांच्या जिवनावर आधारित सिनेमा आयुष्यातील गुण शिकवतो असे भाजपा राष्ट्रीय महासचिव कैलाश विजवर्गीय यांनी ट्वीट केलंय.



असं असलं तरीही सिनेमा पंतप्रधानांच्या जिवनावर आधारित असल्याचे निर्माता कुठेच अधोरेखित करताना दिसत नाही पण सिनेमाची एक झलक पाहीली तर ते लगेच लक्षात येते.



सिनेमाच्या प्रमोशनसाठी भाजपा नेते आणि कार्यकर्ते जय्यत तयारीला लागलेयत. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद, जयंत सिन्हा, राज्यवर्धन राठोड आणि प्रकाश नड्डासहित अनेक बडे नेते या सिनेमाचे ट्वीट करताहेत. भाजपा ऑफिशियल ट्विटर हॅंडलसहित भाजपाच्या अनेक राज्यांच्या ट्विटर हॅंडलवरून हा सिनेमा प्रमोट करण्यात येतोयं. २०१४ लोकसभा निवडणुकीआधीही पंतप्रधान मोंदीवर आधारित बाल नरेंद्र नावाचं कॉमिक्स आलं होतं.


२९ जुलैला रिलीज  



राष्ट्रपती भवनात मंगळवारी या सिनेमाचा विशेष शो ठेवण्यात आला होता.  महेश हडावळे निर्मित 'चलो जीते है' सिनेमा २९ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येतोयं.