मुंबई : सुशांत सिंह राजपूत प्रेक्षकांना लवकरच इतिहासाची सफर घडवणार आहे. सुशांत 540 बीसी ते 2015 पर्यंतचा या 2000 वर्षापर्यंतचा हा प्रवास या सिनेमांत दाखवणार आहे. या 2000 वर्षात देशातील सर्वात दिग्गज व्यक्तींची माहिती यामध्ये दिसणार आहे. लवकरच सुशांत सिंह राजपूत सिरीज सुरू करणार आहे. या सिरीजमध्ये सुशांत जवळपास 12 बायोपिकचे कॅरेक्टर साकारले आहेत. ही सिरीज इंसेई वेंचप्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी तयार केली आहे. ही कंपनी सुशांत सिंहने आपला बिझनेस पार्टनर वरूण माथुरसोबत सुरू केली आहे. 


दिग्गज व्यक्तींवर बनतेय सिरीज 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सिरीजमध्ये भारतातील दिग्गज व्यक्तींचा समावेश आहे. या सिरीजमध्ये देशातील चाणक्य, लोकप्रिय कवी रविंद्रनाथ टागोर तसेच डॉक्टर एपीके अब्दुल कलाम सारख्या व्यक्तींचा जीवनप्रवास दाखवण्यात आला आहे. 


सुशांतची कंपनी बनवतेय ही सिरीज 


इंसेई वेंचर्स प्रायव्हेट लिमिटेडमधील फाऊंडर पार्टनर वरूण माथुरने सांगितलं की, देशातील महान व्यक्तींची माहिती या सिरीजमध्ये दिसणार आहे. आशा आहे की, लोकांना हा प्रयत्न आवडेल. अशा 12 महान व्यक्तींचा यामध्ये समावेश आहे ज्यांची उत्तम भारत बनवण्यात महत्वाची भूमिका आहे.