मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतचा चित्रपट चंद्रमुखी 2 बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. या अभिनेत्रीच्या या चित्रपटाची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट तामिळ, हिंदी, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. अशा परिस्थितीत आता या चित्रपटाचा हिंदी ट्रेलर रिलीज झाला आहे जो लोकांना खूप आवडला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलिवूड क्वीन कंगना राणौत प्रत्येक वेळी तिच्या अभिनयाने लोकांची मने जिंकते. तिचा प्रत्येक लूक पाहून चाहते आश्चर्यचकित होतात. आता पुन्हा एकदा अभिनेत्री 'चंद्रमुखी 2' च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे. या चित्रपटाच्या रिलीजच्या प्रतीक्षेत असलेल्या तिच्या चाहत्यांसाठी एक मोठी खूशखबर आहे. खरंतर आता या चित्रपटाचा हिंदी ट्रेलर रिलीज झाला आहे.


ट्रेलरमध्ये काय दाखवलं आहे
'चंद्रमुखी 2' च्या हिंदी ट्रेलरमध्ये एक माणूस पहिल्यांदा एका कुटुंबाला 17 वर्षांपूर्वीची चंद्रमुखीची गोष्ट सांगताना दिसत आहे. या ट्रेलरमध्ये कंगना राणौतची फक्त एक झलक दाखवण्यात आली आहे. यानंतर, राघव लॉरेन्सची एन्ट्री दाखवण्यात आली आहे.  जो चंद्रमुखीपासून कुटुंबाला वाचवताना दिसत आहे. या ट्रेलरमध्ये कंगना राजा वेट्टयानच्या दरबारात डान्सरच्या भूमिकेत दिसत आहे.


कंगना रणौतने 'चंद्रमुखी 2' मधील तिच्या भूमिकेसाठी खूप मेहनत घेतली आहे. यासाठी अभिनेत्रीने भारतीय शास्त्रीय नृत्यातही स्वत:ला तयार केलं आहे. ट्रेलर पाहिल्यानंतर आता चाहत्यांची चित्रपटासाठीची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.


'चंद्रमुखी 2'चा हिंदी ट्रेलर लाँच होताच चाहत्यांच्याही त्यावर प्रतिक्रिया येऊ लागल्या. कमेंट करत एका यूजरने लिहिलं आहे की, 'ज्या हॉरर फिल्ममध्ये राघव आहे, ती फिल्म बेस्ट आहे. शिवाय कंगनाचे उत्कृष्ट संयोजन नक्कीच हिट होणार आहे. तर दुसर्‍याने लिहिलं आहे की, 'Wow what an amazing trailer, can't wait'.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


कंगना राणौतचा चित्रपट कधी प्रदर्शित होणार?
कंगना राणौतचा हॉरर चित्रपट 'चंद्रमुखी 2' 28 सप्टेंबरला चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. या चित्रपटात कंगनाचा वेगळा अवतार पाहण्याची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. यासोबतच कंगना राणौतचा चित्रपट 'फुक्रे ३' सोबत २८ सप्टेंबरला टक्कर देण्यासाठी सज्ज आहे. आता लोक कोणावर प्रेमाचा वर्षाव करतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.