मुंबई : 'मंचावरून पहिला सा.. लागला त्यो तंबूत बसलेल्या शेवटल्या बहिऱ्या म्हाताऱ्याच्या कानापर्यंत पोहोचायलाचं पाहिजे..' सध्या सर्वत्र 'चंद्रमुखी' सिनेमाची चर्चा सुरु आहे.  नुकताचं सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. सिनेमातील अभिनेत्री अमृता खानविलकरची लावणी... तिच्या लावणीवर आणि सौंदर्याच्या प्रेमात पडलेला आदिनाथ कोठारे सिनेमा एका राजकारण्याची भूमिका साकरताना दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लग्न झाल्यानंतरही आदिनाथ अमृताच्या प्रेमात गुंतल्यामुळे त्याच्या पत्नीच्या जीवाची झालेली दशा सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न दिग्दर्शकांनी केला आहे.



आदिनाथ सिनेमात दौलतराव देशमाने प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे, तर त्याच्या पत्नीच्या भूमिकेला अभिनेत्री मृण्मयी देशपांडे न्याय देताना दिसणार आहे. एवढंच नाही, तर सिनेमात प्रेक्षकांना आदिनाथ आणि अमृतामध्ये असणारे रोमँटिक सिन अनुभवता येणार आहेत.


सिनेमातील 'चंद्रा' या लावणीने प्रेक्षकांच्या मनात राज्य केलं आहे. सिनेमा 29 एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. अमृताने सिनेमाचा एक पोस्टर शेअर करत कॅप्शनमध्ये, '“चंद्रमुखी उमाजीराव जुन्नरकर” ..... आपके सामने हाजीर हैं, ह्या तमाशाचा येक फूल यांड फायनल खेळ सादर करायला …एका कलावंतीणिचा साज शृंगार लेऊन उभी हाय ही चंद्रा आता काय रंगायचाय तो तमाशाचा फड हितचं रंगूद्या..'