आशीष अम्बाडे, झी मीडिया, चंद्रपूर : मिसेस इंडिया स्पर्धेची विजेती शिल्पा आडम चंद्रपुरात दाखल झाली. सध्या सोलापुरात असलेल्या चंद्रपूरच्या या विवाहित महिलेने 'मिसेस इंडिया 2021'(Mrs India 2021) चा मुकुट पटकाविला. मिसेस इंडिया शिल्पा आडम चंद्रपुरात आल्यावर इथल्या मातीचे ऋण व्यक्त केले. विवाहित स्त्रीला या क्षेत्रात परिश्रम करूनच पुढे जावे लागते यावर दिला भर. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संस्कार व सत्कार्य या जोरावरच पुढची वाटचाल करणार असल्याचे मत, याच वर्षी अमेरिकेतील मियामी शहरात होणाऱ्या 'मिसेस इंटरनॅशनल स्पर्धेत' भारताचे प्रतिनिधित्व शिल्पा आडम करणार आहे 



विवाहित स्त्रीला या क्षेत्रात परिश्रम करूनच पुढे जावे लागते यावर तिने भर  दिला. संस्कार व सत्कार्य या जोरावरच आपण पुढची वाटचाल करणार असल्याचे मत तिने सन्मान समारोहात व्यक्त केले.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Shilpa Adam (@theshilpaadam)


याच वर्षी अमेरिकेतील मियामी शहरात होणाऱ्या मिसेस इंटरनेशनल स्पर्धेत शिल्पा भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. 


मिसेस शिल्पा आडम म्हणाल्या की, विवाहित महिलांना पतीची साथ असणे अत्यंत गरजेचे आहे. भारताची राष्ट्रभाषा हिंदी असून, अमेरिकेतील मयामी शहारामध्ये होणाऱ्या कार्यक्रमात हिंदी भाषेचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मला मिळाली आहे. जगात इंग्रजी भाषेला फार महत्व प्राप्त झाले आहे. मात्र, मराठी भाषिक मिसेस इंडिया म्हणून राष्ट्रभाषा म्हणजे हिंदीचे प्रतिनिधीत्व करणार आहे.”