`आदिपुरूष` रिलिज झाल्यानंतर `छपरी` शब्द का होतोय ट्रेण्ड? पाहा काय आहे अर्थ
Chapari Word On Trend After Adipurush: `आदिपुरूष` या चित्रपटाची सध्या सगळीकडेच चर्चा आहे. या चित्रपटाला नेटकरी सपाटून ट्रोल करताना दिसत आहेत. त्यातच आता एक शब्द हा सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे.
Chapari Word On Trend After Adipurush: 'आदिपुरूष' हा चित्रपट फ्लॉप का गेला? हे विनोदी पद्धतीनं सांगणारे त्यानिमित्तानं सध्या सोशल मीडियावर तूफान मीम्स आणि जॉक्स व्हायरल होताना दिसत आहेत. त्यामुळे या चित्रपटाची सध्या सगळीकडेच जोरदार चर्चा रंगली आहे. परंतु तुम्हाला माहितीये का एक शब्द जो तुम्ही आम्ही अनेकदा ऐकला असेल सध्या हा शब्द सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. काल 16 जूनला 'आदिपुरूष' हा चित्रपट प्रदर्शित झाला असून या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली असली, चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंगही फार चांगले असले तरीसुद्धा या चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करू शकलेला नाही. अनेक प्रेक्षकांनी या चित्रपटावर नाराजी व्यक्त केली आहे. सोबतच काही प्रेक्षकांना हा चित्रपट आवडलाही आहे. परंतु एक शब्द हा चित्रपट काल प्रदर्शित झाल्यानंतर चांगलाच ट्रेण्डमध्ये आला आहे.
हा शब्द आहे 'छपरी'. तुम्ही म्हणाल की 'आदिपुरूष' चित्रपटाला मिळालेला विरोध पाहता लोक अनेक तऱ्हेने या चित्रपटाला ट्रोल करत आहेत परंतु या पार्श्वभुमीवर हा शब्द ट्रेण्ड होतो आहे. परंतु तुम्हाला प्रश्न पडला असेल की नक्की हा शब्द ट्रेण्ड होण्यामागे कारण काय? तेव्हा या लेखातून आपण जाणून घेणार आहोत की हा शब्द सध्या सोशल मीडियावर हा चित्रपट प्रदर्शित झाल्या झाल्या का गाजतो आहे.
मुळातच 'छपरी' हा शब्द आपण अनेकदा आपल्या दैंनदिन व्यवहारात वापरताना दिसतो. या शब्दाचा अर्थ असा की एखादी गोष्ट किंवा वस्तू आपल्याला अजिबात आवडली नाही तर आपण त्याला 'काय छपरी आहे?' असं संबोधतो. उदाहरणार्थ, 'काय छपरी गाडी आहे' किंवा काय 'छपरी दिसतोय' वैगेरे वैगेरे. आता 'आदिपुरूष' हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर 'छपरी' हा शब्द लोकांच्या तोंडी आणि त्यांच्या सोशल मीडियावर प्लॅटफॉर्मवर्स गाजतो आहे. गुगलवर सर्च केल्यावर या शब्दाचे नानातऱ्हेचे अर्थ समोर येताना दिसत आहेत. शिवीही या शब्दाचा अर्थ असू शकतो.
हेही वाचा - VIDEO: लेकाच्या संगीत सेरेमनीमध्ये Sunny Deol यांनी केला 'मैं निकाला गड्डी लेके' गाण्यावर डान्स
गुगलवर सर्च केल्यावर या शब्दाचे नानातऱ्हेचे अर्थ समोर येताना दिसत आहेत. शिवीही या शब्दाचा अर्थ असू शकतो. जर तुम्ही अर्बन डिक्शनरीवर गेलात तर तुम्हाला या शब्दाचा अर्थ एक बेजबाबदार व्यक्ती असा सांगितला आहे. म्हणजेच एक असा व्यक्ती ज्यानं ट्रेण्डी लुकतर परिधान केला आहे परंतु त्यात तो सूट होत नाहीये. त्याचा पेहेराव हा दुसऱ्याच्या तुलनेत वेगळा असतो. यावेळी 'आदिपुरूष' या चित्रपटाला घेऊन प्रेक्षक नाराज आहेत. रावणाच्या लुकवरही अनेकांनी आक्षेप घेतले आहेत तर या चित्रपटातील संवादांवरही लोकांनी नापसंती व्यक्त केली आहे.
जेव्हा हा चित्रपट लोकं पहिल्यांदा पाहून बाहेर आले तेव्हा लोकांनी या चित्रपटातील संवाद हे छपरी आहेत असं म्हटलं आहे. त्यामुळे काल दिवसभर हा शब्द ट्रेण्ड झाला आहे. या चित्रपटात रावणाची लंका ही सोन्याची नाही तर काळ्या दगडाची वाटतेय असं लोकांनीही म्हटलं आहे.