मुंबई : 200 कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी आरोपी सुकेश चंद्रशेखर याच्यावर ईडीने आरोपपत्र ठेवले आहे. याच सुकेश चंद्रशेखरबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. सुकेश चंद्रशेखरने काही अभिनेत्रींशी वेगवेगळ्या नावाने संपर्क साधला होता. तसेच त्यांना महागड्या वस्तूही भेट दिल्या होत्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुकेश चंद्रशेखर याने ज्या अभिनेत्रींना आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला होत्या त्यापैकी काहींची नावे ईडीच्या तपासात पुढे आली आहेत. तो तुरुंगात असताना अनेक बॉलिवूड अभिनेत्रींनी सुकेशची भेट घेतली होती.


मिळालेल्या माहितीनुसार, सुकेशने अभिनेत्री सारा अली खान, जान्हवी कपूर, भूमी पेडणेकर यांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी महागड्या भेटवस्तू पाठवल्या होत्या. तर, जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेही यांच्यासह आणखी काही अभिनेत्रींना त्याने आपल्या जाळ्यात ओढलं होतं.


सुकेश चंद्रशेखरने या अभिनेत्रींना आपली ओळख 'शेखर' अशी करून दिली होती. त्याच्यासाठी काम करणारे लोकं वेगवेगळ्या नावांनी या अभिनेत्रींच्या संपर्कात होते अशी माहिती समोर आलीय. शेखरने जान्हवी कपूरला १९ लाख रुपयांची एक बॅग दिली होती. तर, सारा अली खानला एक मगागडं घड्याळ गिफ्ट म्हणून दिलं होतं.


ईडीच्या तपासात अभिनेत्री भूमी पेडणेकर हिचंही नाव पुढे आलंय. पण, भूमीने त्याच्याकडून कोणतीही भेटवस्तू स्वीकारलेली नाही, असेही कळतंय.