'तारक मेहता'मध्ये मुनमुन दत्ताला कशी मिळाली 'बबिता जी'ची भूमिका?

मुनमुन दत्ताला 'बबिता जी' या नावाने ओळखले जाते. मात्र, तुम्हाला माहिती आहे का की तिला या मालिकेत 'बबिता जी'ची भूमिका कशी मिळाली?   

| Oct 02, 2024, 13:01 PM IST
1/6

मुनमुन दत्ता

'तारक मेहता का उल्टा चश्मा' या प्रसिद्ध मालिकेतून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री मुनमुन दत्ता ही 'बबिता जी' या पात्रातून घराघरात पोहोचली आहे. 

2/6

हम सब बाराती

लहानपणी मुनमुन दत्ता आकाशवाणी आणि दूरदर्शनमध्ये काम करायची. 2004 मध्ये मुनमुन दत्ताने टीव्ही शो 'हम सब बाराती'मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. 

3/6

दिलीप जोशी

रिपोर्टनुसार, 'तारक मेहता'च्या जेठालालची भूमिका साकारणारे दिलीप जोशी आणि मुनमुन दत्ता आधीच संपर्कात होते.  

4/6

बबिता जी

दिलीप जोशी यांनी मुनमुन दत्ताला मालिकेत 'बबिता जी'च्या भूमिकेसाठी ऑडिशन देण्यास सांगितले होते. मुनमुन दत्ताने त्यांना होकार दिला आणि ऑडिशनसाठी गेली.

5/6

मुनमुन दत्ताची निवड

त्यानंतर 'बबिता जी'च्या भूमिकेसाठी मुनमुन दत्ताची निवड झाली. गेल्या अनेक वर्षांपासून मुनमुन दत्ता 'तारक मेहता'सोबत जोडली गेली आहे. 

6/6

मोठा चाहता वर्ग

'बबिता जी'च्या भूमिकेतून तिला एक वेगळी ओळख मिळाली आहे. सोशल मीडियावर अभिनेत्री खूप सक्रिय असते. तिचा मोठा चाहता वर्ग आहे.