मुंबई : छोट्या पडद्यावरील अभिनेत्री चारू असोपा (Charu Asopa) आणि सुष्मिता सेनचा भाऊ राजीव सेन (Rajeev Sen) यांच्या आयुष्यात सध्या खूप गडबड सुरू आहे, पण ते दोघेही मुलगी जियानाच्या वाढदिवसासाठी सगळं काही विसरून एकत्र आले आहेत. दोघांनी मिळून मुलीचा पहिला वाढदिवस साजरा केला. चारूनं तिच्या यूट्यूब चॅनलवर एक व्लॉग शेअर केला आहे, ज्यामध्ये हे सेलिब्रेशन दाखवण्याच आले आहे आहे. या पार्टीत संपूर्ण कुटुंब उपस्थित होते. सुष्मिताच्या दोन्ही मुलीही यावेळी दिसल्या. मात्र, या पार्टीत सुष्मिता स्वतः दिसली नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्हिडिओमध्ये चारू असोपा तिची मुलगी जियानावर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहे. जेव्हा तिने जियानाला जन्म दिला तेव्हा तिची भावना काय होती हे सांगताना ती देखील भावूक होते. तिनं सांगितले की तो जियानाशी संबंधित सर्व गोष्टी डायरीत लिहिते. उदाहरणार्थ, ती पहिल्यांदा आई कधी बोलली. केव्हा कॉल केला?


यानंतर चारू आणि जियाना दोघेही बर्थडे पार्टीसाठी तयार होतात. ती थेट रेस्टॉरंटमध्ये जाते, जिथे संपूर्ण कुटुंब उपस्थित असते. तिथे गियानाच्या पहिल्या वाढदिवसाचा केक कापला जातो. यादरम्यान चारू आणि राजीव एकत्र असतात. संपूर्ण कुटुंब आनंदी दिसते. चाहत्यांना सुष्मिताची उणीव भासली असली तरी तिच्या दोन्ही मुली मात्र नक्कीच दिसल्या. (Charu Asopa And Rajeev Sen Celebrates Daughter Ziana First Birthday Together Amid Divorce News Sushmita Sen Post Viral) 



सुष्मिता सेन जियानाच्या वाढदिवसाला उपस्थित नसली तरी तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून चारू आणि राजीव यांच्या मुलीसाठी प्रार्थना केली आहे. 



चारू असोपानं राजस्थानमधील मारवानी व्यावसायिकाशी लग्न केले, परंतु नोव्हेंबर 2016 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. यानंतर चारू नीरज मालवीयसोबत रिलेशनशिपमध्ये होती. असे म्हटले जाते की, दोघांनीही राजस्थानमध्ये एंगेजमेंट केली होती, पण 2017 मध्ये हे नातेही तुटले. 2019 मध्ये चारूनं सुष्मिता सेनचा भाऊ राजीव सेनसोबत लग्न केले. चारूचे हे दुसरे लग्न आहे.


राजीवचा आरोप होता की चारूनं तिच्या पहिल्या लग्नाबद्दल लपवून ठेवले होते. या वर्षी जुलैमध्ये त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्या समोर येऊ लागल्या, परंतु सप्टेंबरमध्ये दोघांनी लग्नाला संधी देण्याची घोषणा केली. पण त्यांच्या नात्यातील कटुता आणखी वाढली. ऑक्टोबरमध्ये चारूनं राजीववर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला होता.