मुंबई: टेलिव्हिजनवरील 'कॉफी विथ करण' हा शो कायमच चर्चेत असतो. या कार्यक्रमात बॉलिवूड कलाकारांकडून केली जाणारी वक्तव्ये, गौप्यस्फोट यामुळे प्रेक्षकांमध्ये हा शो चांगलाच लोकप्रियही आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या शोच्या पुढील भागात सैफ अली खान आणि त्याची मुलगी सारा अली खान दिसणार आहेत. त्यापूर्वी या भागाचा एक प्रोमो सध्या चांगलाच गाजत आहे. 


या प्रोमोमध्ये करण जोहर सैफला करिनाविषयी प्रश्न विचारताना दिसत आहे. करिनाचा जीम लूक हा नेहमीच चर्चेत असतो, असे करणने म्हटल्यानंतर सैफने त्यावर उत्स्फुर्तपणे प्रतिक्रिया दिली. 


यावेळी सैफची मुलगी सारा बाजूलाच बसली होती. सैफने करिनासोबतच्या प्रायव्हेट क्षणांविषयी बोलायला सुरुवात केल्यानंतर तिने लगेचच कानावर हात ठेवले. सैफचा बिनधास्तपणा पाहून करणलाही आश्चर्याचा धक्का बसला.


यानंतर करणने साराचा बॉयफ्रेंड कसा असावा, याबद्दलही सैफला विचारले. त्यावरही सैफने मजेशीर उत्तरे दिली.