प्रदर्शनापूर्वीच `छपाक` वादात, कथाचोरीचा आरोप
२७ डिसेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
मुंबई : अभिनेत्री दिपीका पदुकोणचा 'छपाक' चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. ऑसिड पीडित लक्ष्मी अग्रवालच्या आयुष्यावर आधारलेल्या या चित्रपटाची कथा चोरल्याचा आरोप चित्रपटाच्या निर्मात्यांवर करण्यात आला. चित्रपटाची निर्मिती फॉक्स स्टोर सोबत अभिनेत्री दीपिका पादुकोणनमही केली. लेखक रोकेश भारती यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे.
ही कथा सर्वप्रथम आपणच लिहिली होती आणि त्या आधारावर ‘ब्लॅक डे’ नावाची पटकथा इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्युसर्स असोसिएशनकडे (इम्पा) नोंदणीकृतही केलेली होती. असा दावाही लेखक राकेश भारती यांनी केला आहे.
तसेच याबाबत त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात चित्रपटाच्या प्रदर्शनाला आव्हान दिलं आहे. या संपूर्ण प्रकरणावर २७ डिसेंबरला न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दीपिकाच्या 'छपाक' चित्रपटाबद्दल अनेक चर्चा रंगत आहेत.
दरम्यान, मेघना गुलजार दिग्दर्शित या चित्रपटातून अतिशय संवेदनशील मुद्द्यावर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. ज्यामध्ये ऍसिड हल्ल्यातील पीडितेचा संघर्ष, तिच्या जीवनात येणारा एक सकारात्मक आणि आयुष्याला कलाटणी देणारा दृष्टीकोन अशा गोष्टी अधोरेखित करण्यात आल्या आहेत. विक्रांत मेसी आणि दिपिका पदुकोण यांच्या मुख्य भूमिका असणारा हा चित्रपट १० जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.