‘छिछोरे’ चित्रपट फेम अभिनेत्याचा बाईकवरुन पडून अपघात
त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. सध्या त्याच्यावर अमेरिकेत उपचार सुरु आहेत.
Actor Naveen Polishetty Road Accident : दाक्षिणात्य चित्रपटातून प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता नवीन पोलीशेट्टीचा अपघात झाला आहे. नवीन हा बाईक चालवत असताना अचानक घसरला आणि त्यामुळे तो गंभीर जखमी झाला आहे. या अपघातात नवीनच्या हाताला फ्रॅक्चर झाले आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
हाताला गंभीर दुखापत
मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेता नवीन पोलीशेट्टी याचा अपघात अमेरिकेत झाला आहे. नवीन हा बाईक चालवत असताना अचानक त्याची बाईक घसरली. त्यानंतर तो खाली पडला आणि जबरदस्त जखमी झाला. या अपघातात त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. सध्या त्याच्यावर अमेरिकेत उपचार सुरु आहेत.
सध्या प्रकृतीत सुधारणा
याच पार्श्वभूमीवर नवीनच्या टीमने 'हिंदुस्तान टाईम्स'शी संपर्क साधत अपघाताबद्दल सविस्तर माहिती दिली. “नवीन हा अमेरिकेतील डलासमध्ये बाईक चालवत होता. पण अचानक त्याचे बाईकवरील नियंत्रण सुटलं. त्याची बाईक घसरली आणि तो जमिनीवर पडला. या अपघातात त्याच्या हाताला फ्रॅक्चर झाले आहे. काही दिवसांपूर्वी त्याचा हा अपघात झाला. सध्या तो अमेरिकेत असून तिथेच रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. सध्या त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे,” अशी माहिती त्याच्या टीमने दिली आहे.
नवीन हा सोशल मीडियावर फारसा सक्रीय नसायचा. नवीन हा चित्रपटाच्या प्रमोशनसाठी फक्त सोशल मीडियाचा वापर करायचा. तसेच तो वाढदिवसाच्या दिवशी चाहत्यांना धन्यवाद देण्यासाठीही सोशल मीडियाचा वापर करायचा. नवीन हा 34 वर्षांचा आहे. तेलुगू सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता म्हणून नवीनला ओळखले जाते.
‘छिछोरे’ चित्रपटामुळे बॉलिवूडमध्ये प्रसिद्धी
‘मिस शेट्टी मिस्टर पोलीशेट्टी’ या चित्रपटात तो शेवटचा झळकला होता. यात त्याच्यासोबत अभिनेत्री अनुष्का शेट्टी मुख्य भूमिकेत होती. याचे दिग्दर्शन महेश बाबूने केले होते. नवीनला खरी ओळख ही ‘छिछोरे’ या चित्रपटामुळे मिळाली. या चित्रपटात त्याने अभिनेता सुशांत सिंग राजपूतसोबत काम केले होते. यात त्याने एसिड हे पात्र साकारले होते. त्याला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. सध्या नवीन हा 'अनागानागा ओका राजू' या चित्रपटाचे शूटींग करत आहे. या चित्रपटाची घोषणा 2022 मध्ये करण्यात आली होती.