मुंबई : सोशल मीडिया फेम यशराज मुखाते (Yashraj Mukhate) पुन्हा इंटरनेट सेन्सेशन बनला आहे. टायगर श्रॉफ (Tiger Shroff)चा फेमस डायलॉग 'छोटी बच्ची हो क्या' (Chhoti Bacchi Ho Kya) यावर त्याने एक साँग तयार केलं आहे. यशराजने इन्स्टाग्रामसह यूट्यूबवरही या गाण्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला 8 लाखहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यशराज मुखातेचं नवं साँग प्रचंड व्हायरल -
यशराज मुखातेच्या 'छोटी बच्ची हो क्या' गाण्यामध्ये रुही दोसानी (Ruhee Dosani) आणि नील डान्स करताना दिसत आहे. टायगर श्रॉफचा आगामी 'हिरोपंती 2' चित्रपट प्रदर्शित होणार आहे. मात्र चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच त्याचा 'छोटी बच्ची हो क्या' हा डायलॉग चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. इन्स्टाग्रामवर अनेकांनी या डायलॉगवर रिल्सही बनवल्या आहे. मात्र यशराजच्या हटके व्हिडीओमुळे तो ट्रेन्ड करतो आहे.


यशराजच्या व्हिडीओवर नेटकरी म्हणतात...


'छोटी बच्ची हो क्या' हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. यशराजने व्हिडीओ शेअर केल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.


'यशराज यावर व्हिडीओ तयार करणार याची मला खात्री होती'. तर दुसऱ्याने कमेंट केली की, 'जर हा डायलॉग 'हिरोपंती 2'मध्ये असेल तर चित्रपट नक्कीच हिट होणार'. तर एकाने असंही म्हटलं आहे की, 'छोटी बच्ची हो क्या' डायलॉग टायगर श्रॉफच्या चित्रापटापेक्षा सुपरहिट झाला आहे.