Hyundai Ioniq 9 : 'या' SUV मध्ये आपल्याच काय दुसऱ्यांचा फॅमिलीला पण जागा होईल; 360-डिग्री फिरणारी सीट

जाणून घेऊया Hyundai Ioniq 9 SUV चे बेस्ट फिचर्स.

| Nov 22, 2024, 17:04 PM IST

Hyundai Ioniq 9  : सध्या मार्केटमध्ये इलेट्रीक वाहनांना मोठी डिमांड आहे. अशातच  Hyundai आपली सर्वात पावरफुल इलेक्ट्रीक SUV  लाँच करणार आहे. Hyundai Ioniq 9 असे या कारचे नाव असेल.  सिंगल चार्जमध्ये 620KM ची ड्रायव्हिंग रेंज देणार मिळेल असा दावा कंपनीने केला आहे. या SUV चे आणखी एक खास वैशिष्टय म्हणजे  एका कारने दुसरी कार चार्ज करता येणार आहे. 

1/7

सध्या मार्केटमध्ये असलेल्यया इतर कंपनींच्या SUV च्या तुलनेत Hyundai Ioniq 9  मोठी आणि स्पेसियश आहे. यामुळे मोठ्या फॅमलीसाठी ही कार बेस्ट ऑप्शन ठरणार आहे.  

2/7

या SUV चा टॉप स्पीड 100 KM प्रति तास असा आहे. ही SUV 9.4 सेकंदात 80 ते 100 KM पिकअप घेईल असा दावा कंपनीने केला आहे. या कारचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यात 360-डिग्री फिरणारी सीट देण्यात आली आहे.   

3/7

या कारमध्ये 110.3kWh क्षमतेचा दमदार बॅटरी पॅक देण्यात आला आहे. सिंगल चार्जमध्ये ही कार 620 किमीची ड्रायव्हिंग रेंज देईल असा दावा कंपनीने केला आहे.   

4/7

350kW च्या चार्जरने फक्त 24 मिनिटांत बॅटरी 10 ते 80 टक्के चार्ज होईल. या SUV मध्ये व्हेईकल टू लोड (V2L) फीचर देखील देण्यात आले आहे. या कार द्वारे इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांनाही वीज पुरवता येईल.  

5/7

ही SUV 5,060 मिमी लांब, 1,980 मिमी रुंद आणि 1,790 मिमी उंच आहे. या कारचा व्हीलबेस 3,130 मिमी आहे. Kia EV9 पेक्षा ही कार आकाराने मोठी आहे. या SUV ;e लुक आणि डिझाईन अतिशय आकर्षक आहे.  

6/7

Hyundai Ioniq 9 ही 7 सिटर SUV आहे.  Hyundai Ioniq 9 आकाराने सर्वात मोठी SUV असल्याचा कंपनीचा दावा आहे.

7/7

 लॉस एंजेलिसमध्ये होणाऱ्या ऑटो शोमध्ये ही कार सादर केली जाणार आहे. यानंतर सर्वप्रथम अमेरिकेत ही कार लाँच केली जाणार आहे.