Saloni Daini Bikini Photos: लहानपणी सर्वात आवडत्या मालिका कोणत्या असा प्रश्न विचारला तर आपल्याकडे त्याची भरपूर मोठी लिस्ट असेल. तुम्हाला कॉमेडी सर्कस ही मालिका आठवतंच असेलच. या मालिकेतून एक लहानशी मुलगी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती जिचं तेव्हा चांगलंच कौतुक केले होते. तिच्या क्यूटनेसनं प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. तिचे कॉमेडी व्हिडीओज हे आजही चर्चेत असतात. सोशल मीडियावरही तिचे व्हिडीओज हे व्हायरल होताना दिसतात. यावरून आता तुमच्या लक्षात आलेच असेल की आम्ही कोणाबद्दल बोलत आहोत. हो, तीच ती गंगूबाई म्हणजेच बालकलाकार सलोनी दैनी. सलोनी ही आता मोठी झाली असून ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगते. सध्या तिची बिकीनीमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सलोनी ही लहानपणी गंगुबाई या भुमिकेमुळे चांगलीच गाजली होती. त्यावेळी ती अत्यंत गोड आणि हेल्दीही दिसायची. ती तिच्या विनोदी भुमिकेसाठी चांगलीच चर्चेत होती. परंतु मध्यंतरी तिच्या वजनामुळेही ती फार मोठ्या प्रमाणात ट्रोल झाली होती. त्यामुळे तिला अनेकदा तिच्या वजनावरूनही खूप काही ऐकावे लागले होते. परंतु सध्या व्हायरल होणारे तिचे फोटो पाहून मात्र तुम्हाला विश्वास बसणार नाही की तिनं चक्क आपलं वजन कमी केलं आहे. सलोनीनं 80 किलो वजन कमी करत 58 किलो केलं आहे. गेल्या तीन वर्षात तिनं आपलं फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन केले आहे. या काळातला तिचा फॅट टू फीट हा प्रवास खरोखरच थक्क करणारा आहे. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. या काळात तिनं 22 किलो तरी वजन कमी केलं आहे. 


हेही वाचा - काय एनर्जी आहे भावा! दीपिका-रणवीरच्या डान्सनं जिंकली वऱ्हाड्यांची मनं, पाहा VIDEO


सलोनी ही 22 वर्षांची आहे. तिच्या अभिनयानं आणि तिच्या विनोदानं तिनं आपल्या चाहत्यांची मनं जिंकून घेतली होती. परंतु आता तिचं हे ट्रान्सफॉर्मेशन पाहून सगळ्यांनाच धक्का बसला आहे सध्या तिचे बिकीनीतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तिनं आपल्या विविध पोझमधील बिकीनी फोटोज शेअर केले आहेत. आज तिचा 22 वा वाढदिवस आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


19 जून 2001 साली तिचा जन्म झाला. तिचा जन्म सांगली येथे झाला असून ती मराठीमोळी अभिनेत्री आहे. ती लहान असताना विनोदी मालिकांमधून कामं केली आणि सोबतच अनेक मराठी आणि हिंदी मालिकांमधूनही कामं केली आहे. ती पहिली बालकलाकार स्टॅण्डअप कॉमेडीयन होती असं म्हटलं तर वावंग ठरणार नाही.