नॅशनल क्रश रश्मिका मंदानाच्या लहानपणीचे फोटो; तुम्हीही म्हणाल...
रश्मिका सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.
मुंबई : नॅशनल क्रश रश्मिका मंदानाने दाक्षिणात्य सिनेविश्वात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. रश्मिकाच्या चाहत्यांची संख्या पूर्ण भारतात आहे. आता रश्मिका फक्त दाक्षिणात्य चित्रपटांकरीता मर्यादीत राहणारनसून ती लवकरचं बॉलिवूडमध्ये देखील पदार्पण करणार आहे. लवकरचं बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी रश्मिका सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. स्वतःचे क्यूट फोटो पोस्ट करत ती कायम चाहत्यांच्या संपर्कात असते.
सोशल मीडियावर रश्मिकाचे सगळे फोटो व्हायरल होत असतात. रश्मिकाने तिच्या अदांनी चाहत्यांना घायाळ केलं आहे. आता रश्मिकाने तिच्या लहानपणीचा एक फोटो पोस्ट केला आहे. फोटोमध्ये ती अत्यंत क्यूट आणि गोंडस दिसत आहे. रश्मिकाचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
रश्मिकाने फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये 'प्रेमळ कोरोनाच्या जायच्या प्रतीक्षेत आहे.' असं लिहिलं आहे. रश्मिकाच्या या फोटोवर चाहत्यांच्या कमेन्ट आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. रश्मिकाच्या लहानपणीच्या फोटोला 24 लाखांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत.