लहानपणी अशी सुंदर दिसायची ही बॉलीवूड अभिनेत्री
कोण आहे ही अभिनेत्री...
मुंबई : बॉलीवूडमध्ये आज अनेक अभिनेत्रींनी आपलं वर्चस्व निर्माण केलं आहे. अनेक अडचणींचा सामना करुन अनेक बॉलिवूड अभिनेत्री आज यशस्वी झाल्या आहेत. लहानपणी या बॉलीवूड अभिनेत्री पूर्णपणे वेगळ्या दिसायच्या. आज त्यांच्यात मोठा बदल पाहायला मिळतो. अनेक अभिनेत्रींचे लहानपणाचे फोटो पाहिल्यास विश्वास देखील होत नाही की ही तीच अभिनेत्री आहे.
बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूरचं बॉलीवुड करिअर खूपच वेगळं होतं. करीना कपूरने बॉलीवूडमध्ये अनेक सिनेमे केले. आज तिचे अनेक फॅन्स आहेत. कपूर कुटुंबियांमध्ये अनेक कलाकार आहेत ज्यांनी बॉलीवूडमध्ये आपलं करिअर केलं. करीना कपूरने बॉलीवूडच्या अभिनेता सैफ अली खान सोबत विवाह केला. सध्या ती तिच्या आयुष्यात खूप आनंदीत आहे. करिश्मा कपूरने देखील तिच्या बॉलीवुड करिअरमध्ये करीनाला मदत केली
.
आज आम्ही तुम्हाला करीना कपूरच्या लहानपणाशी संबंधित काही गोष्टी सांगणार आहोत. करीना कपूरने तिची फिगर खूप चांगल्या प्रकारे मेनटेन ठेवली आहे. तिला आदर्श मानणाऱ्या अनेक अभिनेत्री बॉलीवूडमध्ये आहेत. लहानपणी ती इतकी बारीक नव्हती.