नवी दिल्ली - बॉलिवूड बादशाह शाहरुख खानचा गेल्या वर्षी प्रदर्शित झालेला चित्रपट 'जीरो'ची बीजिंग इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलसाठी निवड झाली आहे. या फेस्टिवलदरम्यान आलेल्या शाहरुखच्या एका झलकसाठी त्यांच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. चीनमधील चाहत्यांकडून शाहरुखचे जंगी स्वागत करण्यात आले. शाहरुखच्या चाहत्यांचे, त्यांच्यावरील प्रेमाचे अनेक व्हिडिओ सोशल मिडियावर पाहायला मिळतात. असेच चीनमधील शाहरुखचा व्हिडिओ अणि फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत. या व्हिडिओमध्ये शाहरुखच्या अवतीभोवती चाहत्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.






COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाहरुख खान सध्या चीनमधील 9व्या बीजिंग इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी चीनमध्ये दाखल झाला आहे. त्याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. शाहरुख चीनच्या विमानतळावर दाखल होताच त्याच्या अनेक अनेक चाहत्यांनी त्याचे स्वागत करण्यासाठी, त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी मोठी गर्दी केली. चाहत्यांच्या या प्रेमामुळे शाहरुखने भावुक होत त्याच्या जगभरातील सर्व चाहत्यांचे आभार मानले आहेत. 



आनंद एल राय दिग्दर्शित 'जीरो'ला देशाभरातून चांगला प्रतिसाद मिळाला नाही. शाहरुख, अनुष्का आणि कॅटरिना कैफ यांनी चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत. 'जीरो'च्या प्रदर्शनानंतर सुपरस्टार शाहरुखवर मोठी टीका करण्यात आली. बॉक्सऑफिसवरही चित्रपट काही चांगली कमाई करु शकला नव्हता. परंतु आंतरराष्ट्रीय स्तरावर चित्रपटाची प्रशंसा केली जात असून त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. 9व्या बीजिंग आतंरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये 'जीरो' दाखवण्यात येणार आहे.