मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली, त्या क्षणापासून ते अगदी आतापर्यंत वाटेतले अडथळे काही कमी झाले नाहीत. आज महाराज आपल्यात नाहीत. पण, तरीही त्यांच्या कर्तृत्त्वाची किर्ती मात्र आपला ऊर अभिमानानं भरते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजाच इतका धाडसी असल्याच त्याच्या प्रजेबद्दल काय आणि किती सांगावं, हाच प्रश्न पडतो. छत्रपती शिवरायांच्या जीवनप्रवासात असे अनेक प्रसंग घडून गेलेल जिथं त्यांच्यातला राजा, शूरवीर आणि मोठ्या मनाचा व्यक्ती वेळोवेळी पाहता आला. 


अशा या राजाची आणखी एक धाडसी मोहिम अफजल खान वध म्हणजेच 'शेर शिवराज' हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  स्वराज्यावर सावट होऊन आलेल्या शत्रूला पायदळी तुडवून त्यांच्या छाताडात भगवा गाडायचा असं म्हणणारे महाराज सर्वांच्या भेटीला आले आहेत. 


निमित्त आहे ते म्हणजे दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित चित्रपट, 'शेर शिवराज'. चिन्मय मांडलेकर, मुकेश रिषी, चिन्मय मांडलेकर यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणाऱ्या या चित्रपटातून पुन्हा एकदा शिवकालीन प्रसंग साकारला आहे. 


'पावनखिंड'च्या अफाट यशानंतर आता दिग्पाल लांजेकर नव्यानं आणखी एक ऐतिहासिक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. नुकत्याच्या आम्हाला दिलेल्या मुलाखतीमध्ये चिन्मय मांडलेकरने एक खंत व्यक्त केली. यावेळी चिन्मय मांडलेकर बोलताना म्हणाले की,  ''महाराज्यांच्या पराक्रमाबद्दलच्या सिनेमांसाठी प्राईम शो मिळण्यासाठी झगडावं लागतं मला याची खंत वाटते. कारण आम्हाला शो मिळतात! रात्री ११ चा शो मिळतो. सकाळी ८- १० चे शो मिळतात. 


मात्र जेव्हा रात्री कामावरुन ८-९ वाजता नोकरदार वर्ग घरी येतो. मुलांच्या सुटट्या सुरु आहेत. तेव्हा बरेच गावातली लोकं आम्हाला सोशल मीडियावर मॅसेज करतात. गावात प्राईम टाईम शो नाहीयेत आम्हाला आमच्या मुलांना आम्हाला हा सिनेमा प्राईम टाईम शोवेळी घेवून जायचं आहे. आम्ही सध्या त्यासाठी प्रयत्न करतोय.'' 



बॉक्स ऑफिसवर इतर चित्रपटांकडून आव्हान असतानाही 'शेर शिवराज' दमदार कामगिरी करत आहे आत्तापर्यंत या सिनेमाने ४.२० कोटी इतकी कमाई केली आहे.