मुंबई : दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवी हे गेल्या काही दिवसांपासून ‘गॉडफादर’ या त्यांच्या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करू शकला नाही. शिवाय यात बॉलिवूडचा भाईजान सलमान खान देखील होता. दरम्यान, चिरंजीवी (Chiranjeevi) आणि त्यांचा मुलगा राम चरण (Ram Charan) यांच्या चाहत्यांची संख्या ही लाखोंमध्ये आहे. यंदाच्या वर्षी चिरंजीवी आणि राम चरण हे ‘आचार्य’ चित्रपटात एकत्रल दिसले होते. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला. हे पाहता चिंरजीवी आणि राम चरणनं याची संपूर्ण जबाबदारी घेतली. 


हेही वाचा : डेनिम वर पैंजण घातलं, म्हणजे गावंढळ म्हणणाऱ्यांना अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर, म्हणाली...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार चिरंजीवी यांनी एका कार्यक्रमात या चित्रपटाच्या मानधनाविषयी खुलासा केला आहे. 'एखादा चित्रपट जेव्हा अपयशी ठरतो तेव्हा त्याची जबाबदारी मी घेतो, आचार्यच्या अपयशाचीसुद्धा जबाबदारी मीच घेतली आहे. तो चित्रपट केल्याचा माझ्या मनात कसलाही पश्चात्ताप नाही. एवढंच नाही मी आणि राम चरण आम्ही दोघांनी आमच्या मानधनाचा 80% वाटा निर्मात्याला परत केला आहे.' पहिल्या काही दिवसांत 73 कोटी इतकी कमाई करणारा आचार्य नंतर मात्र बॉक्स ऑफिसवर कमाई करण्यात अपयशी ठरला. पहिल्याच सोमवारी चित्रपट काढायचा निर्णय दाक्षिणेतील बऱ्याच चित्रपटगृहाच्या मालकांनी घेतला होता. 


हेही वाचा : 'मराठी चित्रपटांना दुय्यम स्थान मिळतं...', रितेश देशमुखच्या 'त्या' वक्तव्यामुळे एकच खळबळ


या चित्रपटाचे दिग्दर्शन कोरताला सिवा यांनी केले. 'आचार्य' हा चित्रपट सामाजिक मुद्द्यावर भाष्य करणारा चित्रपट होता. या चित्रपटाची विचारधारा प्रेक्षकांना पसंतीस न उतरल्यानं दक्षिणेत लोकांनी या चित्रपटाला विरोध केला होता. या चित्रपटात चिरंजीवी आणि राम चरणशिवाय सोनू सूद आणि पूजा हेगडेही होते. दुसरीकडे चिरंजीवी यांचा ‘गॉडफादर’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहे. आता पर्यंत 'गॉडफादर'नं बॉक्स ऑफिसवर 100 कोटींची कमाई केली. या चित्रपटात चिरंजीवी यांच्यासोबत नयनतारा, सत्यदेव हे कलाकार दिसले.