Higest Paid Actor Before Amitabh Bachchan and Rajnikant: बॉलिवूडमध्ये सगळ्यात जास्त मानधन घेणारा अभिनेता कोण असेल असा प्रश्न अनेकदा अनेकांना पडत असतो. त्यातून सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचे नाव हे पुढे येते. अमिताभ बच्चन यांच्या वरचढ कोणीच नाही असं अनेकदा म्हटलं जातं. परंतु तुम्हाला माहितीये का असा एक सुपरस्टार मात्र खुद्द बिग बी अमिताभ बच्चन यांच्याही वरचढ ठरला होता आणि या अभिनेत्याचे नावं होते चिरंजीवी. आज चिरंजीवी यांचा वाढदिवस आहे. त्यातून चिरंजीवी हे साऊथ इंडियन इंडस्ट्रीतील सर्वात लोकप्रिय सुपरस्टार आहेत. त्यांच्या सिनेमांसाठी प्रेक्षकांची आणि चाहत्यांची मोठी झुंबड लागलेली पाहायला मिळते. आजही त्यांच्याप्रती प्रेक्षकांमध्ये आदर आहे. चिरंजीवी यांचा मुलगा राम चरण हा देखील सिनेसृष्टीमध्ये सक्रिय आहे. मागील वर्षी आलेला त्याचा RRR हा चित्रपट प्रचंड गाजला होता. त्यामुळे त्याची चांगली चर्चा ही रंगलेली होती. हा चित्रपट ऑस्करपर्यंत पोहचला. या चित्रपटातील 'नाटू नाटू' हे गाणं प्रचंड गाजलं होतं. या चित्रपटाला ऑस्कर पुरस्कारही प्राप्त झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चिरंजीवी यांना एकेकाळी Bigger Than Bachchan असे संबोधले गेले होते. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली होती. तुम्हाला जाणून घेऊ आश्चर्य वाटेल की नक्की यावेळी त्यांनी Bigger Than Bachchan असं का बरं संबोधलं गेलं होतं? त्यावेळी चिरंजीवी हे सोशल मीडियावर सगळ्यात जास्त मानधन घेणाऱ्यातले होते. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली होती. तेव्हा त्यांच्या जन्मदिनानिमित्त जाणून घेऊया त्यांच्याबद्दलचे काही Unknown Facts जे कदाचित तुम्हाला माहितीही नसतील. 


आज बॉलिवूड म्हणा किंवा टॉलिवूड म्हणा, कोणतेही सुपरस्टार म्हणा. त्यांची अनेकदा चर्चा रंगलेली असते ती म्हणजे त्यांच्या मानधनाची. कुठला कलाकार हा कुठल्या रोलसाठी, चित्रपटासाठी कोण किती मानधन घेतो याची अनेकदा चर्चा रंगलेली असते. आजच्या काळातले सिनेमे हे कोटीच्या कोटी उड्डाणे घेताना दिसत आहेत. त्यामुळे केवळ तुटपुंज्या बजेटमध्ये ना चित्रपट होतात ना त्यांची कमाई होते. शेवटी इट्स अ सिरियस बिझनेस. त्यामुळे आज चर्चा असते ती म्हणजे त्यांच्या कमाईची. आज प्रत्येक चित्रपटासाठी कलाकार हे 100 कोटी सहज घेताना दिसतात. 


हेही वाचा : 24 कॅरेट सोन्याचा चहा, धर्मासाठी अभिनयाला रामराम, आज आहे एका मुलाची आई; अभिनेत्री सना खानचं वादग्रस्त आयुष्य


परंतु आता आपण जाऊया थोडंस मागे. 30 वर्षांपुर्वी मात्र अमिताभ बच्चन, शाहरूख खान, सलमान खान, रजनीकांत हे फार मोठे सुपरस्टार होते परंतु त्यांच्यापेक्षाही सर्वाधिक मानधन घेणारे सुपरस्टार ठरले होते, अभिनेते चिरंजीवी. त्यावेळी सर्वाधिक मानधन घेणारे चिरंजीवी हे एकमेव अभिनेते ठरले होते. त्यांनी सर्वांच्या वर 1 कोटी रूपयांचे मानधन घेतले होते. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली होती. हे वर्ष होतं 1992. तेव्हाच्या सप्टेंबर महिन्यात माध्यमांमध्ये फक्त एकच चर्चा रंगलेली होती आणि ती म्हणजे रजनीकांत यांची. तेव्हा सप्टेंबर महिन्याच्या स्टारडस्ट मॅगजीनमध्ये चिरंजीवी हे सर्वाधिक मानधन घेणारे अभिनेते ठरले होते. त्यांनी Aapabandhavudu या चित्रपटासाठी चक्क 1.25 कोटी रूपये घेतले होते. हा चित्रपट तेलुगू चित्रपट होता. तेव्हा अमिताभ बच्चन यांनी 85-90 लाख रूपये इतके मानधन प्रत्येक चित्रपटासाठी घेतले होते. 


त्यावेळी चिरंजीवी यांचे अनेक चित्रपट हे गाजले होते. Sye Raa Narasimha Reddy, Godfather, Waltair Veerayya असे अनेक चित्रपट त्यांचे त्यावेळी गाजले होते. त्यावेळी ते तेलुगु चित्रपटसृष्टीतील मेगास्टार होते. समोर आलेल्या रिपोर्टनुसार, चिरंजीवीनंतर रजनीकांत, कमल हसन, सलमान खान, अमिताभ बच्चनही एक कोटी रूपये मानधन आकाराला लागले. त्यामुळे हे तर 'बेहेती गंगा में हात धोना'च झालं होतं.