मुंबई : कलाविश्वात आपल्या घायाळ करणाऱ्या अदांसाठी ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री चित्रांगदा सिंग ही गेल्या बऱ्याच काळापासून चित्रपटांपासून दूर असल्याचं पाहायला मिळत आहे. बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री चित्रांगदा सिंह (Chitrangada Singh) ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सहसा विविध कार्यक्रमांमध्येही तिची उपस्थिती तुलनेनं कमीच असल्याचं दिसत आहे. असं असलं तरीही वैयक्तिक जीवनात मात्र सध्या ती मित्रपरिवार आणि स्वत:लाच जास्त वेळ देत असल्याचं स्पष्ट होत आहे.अत्तापर्यंत अभिनेत्री बऱ्याच सिनेमात झळकली. पण ती बॉलिवूडमध्ये फार काही कमाल करु शकली नाही. 


अभिनेत्री सोशल मीडियावरही सक्रिय असते. सोशल मीडियावर ती नेहमी तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. चाहतेही तिच्या प्रत्येक पोस्टवर प्रेमाचा वर्षाव करत असतात. सोशल मीडियावर तिचा मोठा चाहता वर्ग आहे. नुकताच अभिनेत्रीने एक मोठा खुलासा केला आहे. ज्यामध्ये तिने 'बाबूमोशाय बंदूकबाज' दरम्यान घडलेला धक्कादायक प्रकार सांगितला आहे.


'बाबूमोशाय बंदूकबाज' या सिनेमावेळी चित्रगंधा कास्टिंग काऊचची शिकार झाली आहे. एक्ट्रेसने सांगितलं की, चित्रपटातील इंटिमेट सीनच्या शूटिंगदरम्यान तिच्याकडे अशी काही मागणी करण्यात आली होती, ज्यामुळे ती आश्चर्यचकित झाली होती. त्यानंतर त्याने चित्रपट सोडण्याची घोषणा केली होती.


 'बाबूमोशाय बंदूकबाज' या सिनेमात  नवाजुद्दीन सिद्दीकी तिचा कोस्टार होता. यावेळी दोघांमध्ये इंटीमेट सीन चित्रत होणार होता.  दिग्दर्शक कुशन नंदीला तो इंटीमेट सीन आवडला नाही. त्याला किसिंग सीन 7 सेकंदांनी लांबवायचा होता. तसा सीन पुन्हा शूट करण्याची मागणी तो माझ्याकडे करू लागला आणि मला म्हणाला की मी नवाजच्या वर मी बसावे आणि तो इंटीमेट सीन द्यावा. त्यावेळी मी पेटीकोट घातला होता. यानंतर त्या दिग्दर्शकाने माझ्याकडे मागणी केली की, मी तो पेटीकोट वर उचलावा आणि माझी बॉडी त्याच्यावर रगडावी. 


मी हा शूट दिल्यानंतर  कुशानने तो सी पुन्हा शूट करण्याचा आग्रह धरला. आणि ते किस  सात सेकंदांनी लांबवण्याचा आग्रह करू लागला. यानंतर चित्रागंदा आमि कुशानमध्ये भांडण झालं आणि या भाडणात त्याने तिला शिविगाळही केली.
 
२००१ मध्ये चित्रांगदानं गोल्फर ज्योती रंधावा याच्याशी लग्न केलं होतं. ज्यानंतर २०१४ मध्ये त्यांच्या वैवाहिक नात्याला तडा गेला. चित्रांगदा आणि ज्योती यांना एक मुलगाही आहे.