Choreographer Chaitanya Suicide : एकदा आपल्याला फेम मिळालं की ते टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला खूप मेहनत करावी लागते. आपलं स्टॅन्डर्ड मेन्टेन करण्यापासून सगळ्या गोष्टी सांभाळाव्या लागतात. बऱ्याचवेळा ती लाइफस्टाईलही आपल्याला झेपत नाही म्हणून अनेक सेलिब्रिटीं हे कर्जात बुडतात. अशात कर्जाची परत फेड करता येत नसल्यानं अनेक सेलिब्रिटी घर विकण्यापासून अनेक गोष्टी कराताना दिसतात. असाच काहीसा प्रकार एका तेलगू कोरिओग्राफरसोबत घडला आहे. या कोरिओग्राफरचे नाव चैतन्य असे आहे. चैतन्यनं आंध्र प्रदेशच्या नेल्लोर येथे आत्महत्या केल्याचे म्हटले जात आहे. त्याच्यावर खूप कर्ज झालं होतं आणि कर्जाची परतफेड करता येत नाही म्हणून त्यानं आत्महत्या केल्याचे म्हटले जात आहे. त्याआधी चैतन्यनं एक व्हिडीओ देखील शेअर केला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चैतन्यनं नेल्लोर क्लबमध्ये आत्महत्या केली होती. असं करण्याआधी चैतन्यनं एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ त्यानं आत्महत्येचा निर्णय घेतल्यानंतर शूट केला होता. या व्हिडीओत चैतन्य बोलताना दिसतो की 'माझी आई, वडील आणि बहिणी यांनी मला कोणत्याही प्रकारे अडचण येणार नाही याची खात्री केली. माझी चांगली काळजी घेतली. मी माझ्या सगळ्या मित्रांची माफी मागतो. मी बर्‍याच लोकांना त्रास दिला आहे आणि मी सर्वांची माफी मागतो. पैशाच्या बाबतीत मी माझा चांगुलपणा गमावला आहे. केवळ कर्ज घेणेच नाही तर ते फेडण्याची क्षमताही असावी लागते, हे खरं आहे. पण मी ते करू शकलो नाही. सध्या मी नेल्लोरमध्ये आहे आणि हा माझा शेवटचा दिवस आहे. माझ्या कर्जामुळे निर्माण झालेल्या समस्या मी सहन करू शकत नाही, असं चैतन्य या व्हिडीओत बोलल्याचे वृत्त इंडिया टुडेने दिलं आहे. 



हेही वाचा : "हे येड्या गबाळ्याचं काम नाही", मराठी भाषेवर Pravin Tarde चं वक्तव्य, म्हणाले 'इंग्रजीत शिवी दिली तर...'


चैतन्यच्या निधनानंतर त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्याच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याला श्रद्धांजली वाहिली आहे. चैतन्यचा हा अखेरचा व्हिडीओ शेअर करत 'अनेकांनी तू इतकं टोकाचं पाऊल का घेतलंस' असं म्हटलं आहे. तर एका नेटकऱ्यानं कमेंट करत चैतन्यला सांगितले की 'आत्महत्या करायला खूप हिंम्मत लागते आणि तिची हिंम्मत तू कर्ज फेडायला किंवा तुझ्या आयुष्यात असलेल्या समस्यांवर काही उपाय काढायला लावली असती तर बरं झालं असतं.' चैतन्य हा तेलगू डान्स शो 'धी' मध्ये देखील दिसला होता. चैतन्यचे सोशल मीडियावर हजोरा चाहते आहेत. त्यांचे डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते.