Commits Suicide: घरात मिळाला Remo D`Souza च्या मेहुण्याचा मृतदेह, गळफास घेत संपवलं जीवन
...त्यामुळेच त्याने आत्महत्येसारखे पाऊल उचलले असावे, असे मानले जात आहे.
मुंबई : प्रख्यात कोरिओग्राफर आणि चित्रपट दिग्दर्शक रेमो डिसूझाचा मेहुणा जेसन वॉटकिन्सचा मृतदेह आज त्यांच्या मुंबईतील मिल्लत नगर येथील निवासस्थानी सापडला. त्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. दुपारी ओशिवरा पोलिसांनी त्याचा मृतदेह विलेपार्ले येथील कूपर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला, जिथे त्याच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून जेसनची तब्येत बिघडली होती आणि त्यामुळेच त्याने आत्महत्येसारखे पाऊल उचलले असावे, असे मानले जात आहे.
रेमो डिसूजाची पत्नी लिझेल रेमो डिसूझा हिने सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले की, तिचा भाऊ आता या जगात नाही. तिचा भाऊ जेसनचे फोटो शेअर करत तिने लिहिले- "का? तू माझ्यासोबत असे का केलेस? मी तुला कधीच माफ करणार नाही."
जेसनचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात आणण्यात आल्याची पुष्टी एका सूत्राने केली आहे, त्यांनी सांगितले की, त्याचा मृतदेह तिथेच आहे. शवविच्छेदन अहवाल आलेला नाही. आणि अशा परिस्थितीत, ते त्यांच्या मृत्यूचे कारण सांगू शकणार नाहीत." रेमो आणि लिझेल सध्या गोव्यात आहेत जे तिथे जवळच्या व्यक्तीच्या लग्नासाठी गेले होते.