मुंबई : बॉलिवूड विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध कोरियोग्राफर रेमो डिसुझाला ह्रदयविकाराचा झटका आला आहे. त्यामुळे त्याला मुंबईच्या कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्याची प्रकृती आता स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे. त्याच्यासोबत पत्नी रुग्णालयात असल्याचं कळत आहे.