Chris Rock asked Jada Pinkett Smith oout for a date : हॉलिवूड सुपरस्टार विल स्मिथ आणि त्याची पत्नी जॅडा पिंकेट स्मित तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत असते. ऑस्कर 2022 मध्ये विल स्मिथनं कॉमेडियन क्रिस रॉकला स्टेजवर जाऊन कानशिलात लगावली होती. कारण क्रिसनं जॅडा पिंकेट स्मिथनं आजारपणामुळे डोक्यावरील केस काढण्याच्या निर्णयाची आणि त्यामुळे दिसणाऱ्या तिच्या लूक्सची खिल्ली उडवली होती. त्यानंतर सतत विल स्मिथ आणि जेडा स्मिथच्या रिलेशनशिपवरून चर्चा होऊ लागल्या होत्या. आता जॅडा पिंकेट स्मिथचं पुस्तक प्रकाशित होणार असून त्याचं नाव Worthy असं आहे. हे पुस्तक 17 ऑक्टोबर रोजी प्रकाशित होणार आहे. यात जॅडानं तिचं आयुष्य आणि करिअरला घेऊन अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. नुकत्याच दिलेल्या मुलखतीत तिच्या खासगी आयुष्याविषयी अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे आणि त्या गोष्टी जाणून तुम्हाला खूप मोठा धक्का बसेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जॅडानं ही मुलाखत पिपल्स मॅग्झिनला दिली होती. या मुलाखतीत जेडानं म्हटलं की 'दरवर्षी उन्हाळा आला की चर्चा सुरु व्हायची की मी आणि स्मित विभक्त होणार आहोत. पण यावेळी क्रिसला वाटलं की आम्ही घटस्फोट घेणार आहोत. त्यामुळे त्यानं मला कॉल केला आणि त्यानं मला थेट विचारलं की मला तुला डेटवर घेऊन जायला आवडेल. माझं असं झालं की तुला नक्की काय म्हणायचं आहे? त्यावर तो म्हणाला की तू आणि विल घटस्फोट घेत आहात ना? मी म्हटलं नाही, क्रिस त्या फक्त अफवा आहेत. त्याला धक्का बसला आणि तो माफी मागत म्हणाला की मला माफ कर आणि ते तिथचं थांबलं.' 



विल स्मिथच्या कॉन्ट्रोवर्सी बद्दल बोलायचं झालं तर त्यानं 2022 मध्ये झालेल्या ऑस्कर कार्यक्रमात जॅडाच्या बाल्ड लूकवरून क्रिस रॉकनं कमेंट केली होती. जॅडाला अलोपेसियाचा त्रास आहे, ज्यामुळे तिचे केस गळत आहेत. 


हेही वाचा : चाहत्यांना हात दाखवत होते बिग बी तेव्हा लपून Video शूट करत होत्या ऐश्वर्या, आराध्या आणि नव्या


जॅडानं याविषयी देखील पुढे सांगत म्हणाली की 'क्रिस रॉकनं तिच्याशी 2022 मध्ये झालेल्या ऑस्कर कार्यक्रमाच्या ब्रेकमध्ये तिच्याशी माफी मागण्यासाठी बोलण्याचा प्रयत्न केला. तो म्हणाला माझा तुला दुखावण्याचा प्रयत्न नव्हता. मी म्हटलं की मी याविषयी आता बोलू शकत नाही. हे खूप जुनं प्रकरण आहे. माझं असं झालं की हे 2016 च्या ऑस्करशी संबंधीत आहे की काय?'