मुंबई : बॉलीवूडमध्ये डेब्यू करण्या अगोदरच चंकी पांडेची मुलगी यासाठी होतेय लोकप्रिय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे देशभराच्या मीडियाला इंप्रेस करण्यानंतर इंटरनॅशनल स्तरावर आपली ओळख निर्माण करण्यात यशस्वी झाली आहे. पॅरिसमध्ये आयोजित केलेल्या २५ व्या Bal Des Bebutantes इव्हेंटमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. या समारंभात हॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री रीस विदरस्पूनची मुलगी एवा फिलीपसोबतच जगभरातील राजकुमारी देखील यामध्ये सहभागी होणार आहेत.  अनन्याने बॉल डांससाठी जॉ पॉल गॉटलेयरचा कोट्योर ड्रेस परिधान केला होता. 



काय आहे ‘Le Bal des Débutantes’?


दरवर्षी  नोव्हेंबर महिन्यात पॅरिसमध्ये असाच एक इव्हेंट रंगतो. याचे नाव, ‘Le Bal des Débutantes’ या इव्हेंटमध्ये जगभराच्या सेलिब्रिटी फॅमिलीमधील २० मुली व २० मुले भाग घेतात. या इव्हेंटला ‘Le Bal’ ’ नावानेही ओळखले जाते. या फॅशन इव्हेंटद्वारे १६ ते २२ वयोगटातील मुली फॅशन व मीडियाच्या ग्लॅमरस जगात डेब्यू करतात. १९९२ मध्ये ओफेली रेनॉर्डने या ‘Le Bal’चा संपूर्ण फॉर्मेट तयार केला होता.   गत शनिवारी हा इव्हेंट पार पडला आणि यंदा अभिनेता चंकी पांडे याची मुलगी अनन्या पांडे हिने ‘Le Bal’ ’मध्ये डेब्यू केला.


अनन्यासोबत तिचा कझिन अहान पांडे यानेही या इव्हेंटमध्ये भाग घेतला. अनन्याने रिहर्सलमध्ये अबू जानी आणि संदीप खोसलाने डिझाईन केलेला ब्लॅक व गोल्डन ड्रेस परिधान केला होता.