Vaishnavi Dhanraj : सीआयडी फेम अभिनेत्रीला कुटुंबियांकडून मारहाण, शरीरावरील जखमा दाखवत शेअर केला Video
Vaishnavi Dhanraj Video : गेल्या दहा वर्षांपासून मला माझा भाऊ, वहिनी आणि माझी आई त्रास देत आहेत. त्यांनी मला अनेकदा मारहाण देखील केलीये, असा आरोप वैष्णवीने केला आहे.
CID fame Vaishnavi Dhanraj abused : सीआयडी या प्रसिद्ध मालिकेमध्ये झळकलेली अभिनेत्री वैष्णवी धनराज (Vaishnavi Dhanraj) गेल्या काही काळापासून पडद्याआड होती. मात्र सध्या वैष्णवी खासगी आयुष्यामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. तेरे इश्क में घायाल या मालिकेतून घराघरात पोहोचलेली वैष्णवी धनराजला मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वैष्णवी धनराजने नुकताच एक व्हिडीओ (Vaishnavi Dhanraj Video) शेअर केला असून यामधून तिने खळबळजनक आरोप केले आहेत. दुसरं तिसरं कोणी नसून तिच्याच घरच्यांनी मारहाण केल्याचा आरोप तिने व्हिडीओच्या माध्यमातून केला आहे.
नेमकं काय म्हणाली Vaishnavi Dhanraj?
नमस्कार, मी वैष्णवी धनराज... मला आता तुमच्या सर्वांच्या मदतीची गरज आहे. मी सध्या काशिमीरा पोलीस ठाण्यात असून मला माझ्या कुटुंबियांनी शिवीगाळ आणि मारहाण केली आहे. वैष्णवी धनराजने या व्हिडीओच्या माध्यमातून तिच्या चेहऱ्यावरील आणि हातावरून जखमा दाखवल्या. मला सध्या तुमच्या सर्वांची आणि मीडियाची गरज आहे. कृपया माझी मदत करा, असं वैष्णवी धनराज व्हिडीओच्या माध्यमातून म्हणताना दिसते. वैष्णवीच्या हातावर, ओठांवर, चेहऱ्यावर तसेच हाताच्या बोटांवर जखमा दिसत असल्याने पोलीसांनी या प्रकरणाची नोंद घेतली आहे.
गेल्या दहा वर्षांपासून मला माझा भाऊ, वहिनी आणि माझी आई त्रास देत आहेत. त्यांनी मला अनेकदा मारहाण देखील केलीये. मला पहिल्यांदा मारहाण झालेली नाही. माझ्यासोबत हे अनेकदा झालं आहे. माझं मानसिक खच्चीकरण केलं जातंय. मी कोणासोबत बोलते आणि कुठे जाते यावर ते लक्ष ठेवतात. मला टॉर्चर केलं जातंय. माझ्या मेरी रोडवरील प्रॉपर्टीवर यांचा डोळा आहे. त्यांना माझ्याकडून माझी प्रॉपर्टी हिसकावून घेयचीये, असा आरोप वैष्णवी धनराजने केला आहे.
दरम्यान, वैष्णवीने 2016 मध्ये नितीन शेरावतसोबत लग्न केले. लग्नानंतर तिला अनेक अडचणीचा सामना करावा लागला. त्यावर एका मुलाखतीत तिने यावर खुलासा केला होता. कौटुंबिक हिंसाचारामुळे मी घटस्फोट घेतल्याचं वैष्णवीने घेतल्याचं तिने सांगितलं होतं. सीआयडी, बेहद, बेपन्ना, तेरे इश्क में घायाल, नवरंगी रे आणि आपकी नजरों या मालिकेत वैष्णवीने काम केलंय.