CID Promo : मैत्रित आला दुरावा; ACP प्रद्युमन समोरच अभिजीतनं दयावर का झाडली गोळी?
CID Promo : जेव्हा Best Friend हे एकमेकांचे शत्रू होतात त्यानंतर काय होणार... याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
CID Promo : 90 च्या दशकातील मुलांनी CID हा शो आवर्जून पाहिला आहे. सगळ्यांच्या मनात घर करून असलेला हा शो काही वर्षांपूर्वी अचानक बंद झाला. त्यानंतर त्या मुलांचं बालपण जणू कुठे तरी हरवलं होतं. आजही सगळ्यांना हा शो आठवतो आणि हा शो परत यावा अशी सगळ्यांची बऱ्याच वर्षांपासून इच्छा होती. अशात काही दिवसांपूर्वी हा शो पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय असं सांगत एक घोषणा करण्यात आली होती. आता या शोचा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. यात जे कधी जवळचे मित्र होते ते आता एकमेकांचे विरोधी किंवा शत्रू झाले आहेत. ते दाखवण्यात आल्यानं सगळ्यांना आश्चर्य झालं.
हा शो आता तब्बल 6 वर्षांनी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सोनी एन्टरटेनमेंटच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यातून या मुळ मालिकेत जे कलाकार होते ते पुन्हा एकदा यात पाहायला मिळणार आहेत. प्रोमोच्या सुरुवातीला अभिजीत आणि दया एका डोंगराळ ठिकाणी उभे असल्याचे दिसते. लक्षवेधी गोष्ट म्हणजे हे दोघं सोबत नाही तर एकमेकांच्या विरोधात असल्याचं दिसतं. तर यासगळ्यात एक व्हॉईसओव्हर ऐकायला येतो की जे देशासाठी नेहमी सोबत लढले. आज एकमेकांचे शत्रू झाले आहेत. हे दोघं एकमेकांच्या विरोधात का झाले? इतक्यात एसीपी प्रद्युमन थांबा असं कळकळीनं ओरडतात. तर दुसरीकडे दया अभिजीतला बोलतो 'चला गोली अभिजीत'. दयाच्या या वाक्यानंतर अभिजीत त्याला गोळी झाडतो आणि एसीपी प्रद्युमन हे दयाला आवाज देतात. ज्यांचं नावानं सगळी ओळख आहे, त्यांची गोष्ट अजून बाकी आहे. सीआयडी पुन्हा येतोय प्रेक्षकांच्या भेटीला.
जे दोस्त खास मित्र असतात, ज्यांच्या मैत्रिची सतत चर्चा होते हेच जेव्हा एकमेकांचे शत्रू होतात त्यानंतर काय घडतं. हे पाहण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. या दरम्यान, एसीपी प्रद्युमनची भूमिका साकारणाऱ्या शिवाजी साटम यांनी शो परत येतोय याविषयी त्यांच्या काय भावना आहेत हे सांगितलं आहे. शिवाजी साटम म्हणाले, 'शोच्या या सीझनमध्ये, दया-अभिजीत यांच्यात असलेली मैत्री संपली असून ते एकमेकांच्या विरोधात उभे असतात. यामुळे सीआयडीला मोठा धक्का बसला आहे आणि त्यामुळे एसीपी प्रद्युमनचं आयुष्यात मोठं वादळ आलं आहे.'
हेही वाचा : गोविंदासोबतच्या नात्यावर नीलम कोठारी म्हणाली, 'आम्ही दोघं जेव्हा...'
त्यांनी पुढे सांगितलं की 'सहा वर्षांपूर्वी एसीपी प्रद्युमन यांच्या रुपात कमबॅक करणं हे जणू मला एका स्वप्नासारखं वाटत होतं, कारण या भूमिकेला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळालं होतं आणि आता आणखी गूढ आणि त्यासोबत मनाला भावेल अशी गोष्ट घेऊन येण्याचं वचन देतो.'